कळमनुरी / प्रतिनिधी
कळमनुरी येथील केब्रिज स्कूल ऑफ स्कॉंलर्स शाळेत 1 ऑक्टोबर रोजी शिक्षण परिषद व शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रथम सत्राचे अध्यक्ष मेटाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजयराव तायडे पाटील होते तर मार्गदर्शक डायटचे प्राचार्य गणेश शिंदे व प्रविन रूईकर यांची उपस्थिती होती.
तर दुसऱ्या सत्राचे उदघाटन आ. संतोष टारफे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.प्रज्ञा सातव, डॉ. विशाल राठोड, संजय तायडे, प्रा.नामदेव दळवी, डॉ. संतोष कल्याणकर आदींची उपस्थिती होती. यावेळी वसमत येथील लिटल किग्ज इंग्रजी स्कूल या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला. तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विनायक भोसले यांचा सत्कार करून आदर्श शिक्षक पुरस्कारचे वितरण करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य रत्नमाला चव्हाण, वनिता गुंजकर, डॉ.शितल कल्याणकर आदींची उपस्थिती होती.
हिंगोली- जिल्हा ऍथलेटीक्स यांच्या वतीने येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर निवड चाचणी घेण्यात आली. यावेळी हिरवी झेंडी दाखविताना जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चौतमल, अधिकारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment