मारुती महाराज साखर कारखाना निवडणूकीत मांजरा परिवार यशस्वी

Wednesday, October 24, 2018

औसा/प्रतिनिधी
श्रीसंत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना बेलकुंडच्या निवडणूकीत विकासरत्न विलासरावजी देशमुख शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून मांजरा साखर कारखाना परिवाराने माजीमंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी मंत्री तथा आ. अमितभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश संपादन करुन विरोधी भाजप प्रणित पॅनलचा धुव्वा उडविला आहे.

निवडणुकीचे मुख्य समन्वयक एस.आर. देशमुख यांनी राबविलेल्या शिस्तबध्द प्रचार यंत्रणेतून आ. अमित देशमुख यांच्या नागरसोगा, लामजना, औसा, मातोळा येथील जाहीरसभा आणि आशिव येथील सभासद शेतकर्‍यांना आपला ऊस मांजरा परिवाराकडे घेवून विक्रमी भाव देण्याचे अभिवचन दिले होते. शेतकर्‍यांच्या शेतातील ऊसाचा कायम स्वरुप प्रश्‍न मिटवून पुढच्या वर्षी गळीत हंगाम सुरु करण्यासाठीचे दिलेले अभिवचन यामुळे सभासद शेतकर्‍यांनी कॉंगे्रस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंगे्रसच्या पॅनलवर विश्‍वास ठेवून सर्व १६ जागेवर शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार भरघोस मताने विजयी केले.

भारतीय जनता पार्टीचे अभिमन्यू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप उमेदवारांनी निवडणूक लढविली. ही निवडणूक भाजप नेत्यांच्या हटवादीपणामुळे बिनविरोध होवू शकली नसल्याचे कॉंगे्रस नेत्यांनी सांगत साखर कारखाना हे शेतकर्‍यांचे मंदिर आहे. शेतकर्‍यांच्या चुलीशी कोणी खेळू नये असे सांगितल्याने शेतकरी विकास पॅनलला यश संपादन करता आले. या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे- आशिव अमित माने ३३७१, विलास शिंदे-पाटील- ३४०७ (विजयी), पंडित काकडे- २३६९, व्यंकटराव पाटील- २२४५, औसा गट अनिल झिरमीरे- ३३६३, सुरेश भुरे- ३४१४ (विजयी), सुभाष जाधव- २४०२, संतोष मुक्ता- २१७५, जवळगा (पो.) साळुंके शामराव- ३४४५, यादव हरिश्‍चंद्र ३४४१ (विजयी), यादव महादेव- २३०९, सुर्यवंशी दिलीप- २२३०, मातोळा- पाटील सचिन- ३४३५, शाम भोसले- ३३३९ विजयी, काशिनाथ भोसले- २३०४, काकासाहेब मोरे- २२६३, लामजना सुरेश पवार- ३४७८, गणपती बाजुळगे- ३४२८ (विजयी), अभिमन्यू माने- २२५६, दयानंद अनसरवाउे- २३०८, अनुसूचित जाती प्रवर्ग शिंदे गितेश- ३३२० (विजयी), वाघमारे दिनकर- २१८६, महिला राखीव गट- स्नेहल जगताप- ३४६२, अर्चना भोसले- ३३६९ (विजयी), मिराबाई पाटील- २२३६, निर्मला भोसले- २१८४, इतर मागास प्रवर्ग माळी हनमंत ३५४९ विजयी, माळी लक्ष्मण २३११, भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातून चव्हाण प्रदीप- ३४८२ विजयी, अनंत दोडके २३६१, आणि सहकारी संस्था मतदार संघातून श्रीशैल उटगे यांना ४ (विजयी), वामन पाटील यांना केवळ स्वतःचे १ मत प्राप्त झाले आहे.

सुरुवातीच्या पहिल्या फेरीपासूनच शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते. या निवडणुकीत सहकारी साखर कारखान्यासाठी औसा तालुक्यात भाजप उमेदवारांनी प्रथमच निवडणूक लढवून मोठे आव्हान दिले होते. कॉंगे्रस-शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी भाजप उमेदवारांच्या आशेवर पाणी फेरले. दुसर्‍या फेरीतील आघाडीपासून विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी औसा शहरात फटाक्याची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जनार्धन विधाते, सहाय्यक अधिकारी मधुकर गुंजकर व वृषाली केसकर यांनी काम पाहिले. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरात कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी पूर्ण झाली.

No comments:

Post a Comment