दि प्रतिनिधी
देशभरात विषमुक्त सेद्रिंय पदार्थाची मागणी वाढत आहे, त्यामुळे सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन कारखान्याच्या माध्यमातून सध्या पाचसे हेक्टर सेंद्रिय ऊसची लागवड केली आहे. पुढील हंगामात दिड हजार हेक्टरवर वाढवण्याचे उदिष्ट आहे. या हंगामात देशातील सेंद्रिय साखर निर्मितीचा पहिला मान विलास कारखान्याला मिळणार असल्याचे कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विलास सहकारी साखर कारखान्याच्या १८ वा गळीत हंगाम प्रसंगी बोलत होते.
यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार त्रिंबक भिसे, लातूर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथ शिंदे, रेणा कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील, कृउबा सभापती लालितभाई शाह, जेष्ठ नेते विक्रम हिप्परकर, पंचायत समिति सभापती शितल फुटाणे, मांजरा कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय देशमुख, माजी जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, माजी जि.प. अध्यक्ष संतोष देशमुख, नाथसिंह देशमुख, कृउबा उपसभापती मनोज पाटील, रेणापुर तालुकाध्यक्ष लालासहेब चव्हाण, रेणा कारखान्याचे संचालक प्रविण पाटील, बँकेचे व्हा.चेअरमन चंद्रकांत देवकते, शाहुराज पवार, दौलतराव कदम, संभाजी वायाळ, जगदीश बावणे आदी उपस्थित होते.
आमदार अमित विलासराव देशमुख पुढे म्हणाले की, मांजरा परिवारातील साखर कारखाने अद्यावत करण्यासाठी नवविन तंत्रज्ञान वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जगातील विविध देशात होणार तंत्रज्ञानाच्या वापराच्या माध्यमातून कारखान्याला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करायचा प्रयत्न आहे. बदलत्या काळानुसार हार्वेस्टिंग यंत्राव्दारे ऊस तोडणी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
गळीत हंगाम शुभारंभ म्हणजे शेतकऱ्यांचा सणच
विलासरावजी देशमुख यांच्यामुळेच चांगले काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा सतत मिळते. त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही सहकार आणि साखर उ्दयोगात वाटचाल करीत अहोत. या कारखान्यामूळे जिल्हयातील अर्थकारण बदलले आहे. जिल्हयातील शेतकरी स्वताच्या पायावर उभा राहिला आहे त्याची पत वाढली आहे. शेतकऱ्यांचे स्वप्न साकार झाले आहे. यामध्ये कारखाना कर्मचारी, साखर कामगार, ऊसतोडणी मजूर, तंत्रज्ञ यांचे मोठे योगदान आहे. यामूळे शेतकऱ्यांना सुखी करणारे गळीत हंगामाचा शुभारंभ म्हणजे शेतकऱ्यांचा सणच आहे. एका अर्थाने १८ व्या गळीत हंगामाची सुरूवात म्हणजे शेतकऱ्याच्या सणाला सुरवात झाली आहे असे सांगत शेतकऱ्यासाठी कारखाना कर्मचारी काम करत असतात त्याचेही काम कौतुकास्पद आहे. कारखाना कर्मचाऱ्यामध्ये जे कर्मचारी वैविध्यपूर्ण काम करतील अश्या कर्मचारी वर्गाला अतिरिक्त मोबदला देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
विलास कारखान्याचे विविध योजना व प्रकल्प
विलास सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून रॉ शुगर पासून परदेशात निर्यात करण्यासाठी रिफायनरी शुगर निर्मिती, ऊस पाचटापासून बॉयलर साठी विंधन निर्मिती, बगॅस पासून कागद निर्मिती, डिस्टलरी प्रकल्प, एन्सुलेशन बॉयलर निर्मिती अश्या अनेक योजना व प्रकल्प कारखान्यावर राबविणार असल्याचे अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.
शेतकरी केंद्रबिंदु मानून मांजरा परिवारचे कार्य माजी आ वैजिनाथ शिंदे
विलास सहकारी साखर कारखाना आताप्रयंत ७० लाख में.टन उसाचे गाळप करुन कोट्यवधी रूपये उस बिलापोटी सभासद, ऊसउत्पादक शेतकरी यांना वितरीत केले आहेत. मांजरा परिवारतील सर्व साखर कारखान्याच्या माध्यमातून सर्वाधिक उच्चांकी भाव देऊन शेतकरी बाधवांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवला असल्याचे माजी आमदार वैजनाथ शिंदे यांनी यावेळी गळीत हंगामाला शुभेच्छा देतांना म्हटले आहे.
प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत आमदार त्रयबंक भिसे
लातूर जिल्हयामध्ये गेल्या दोन तीन वर्षात दुष्काळी परिस्थिती आहे. यामूळे शेतकरी आणि संपूर्ण ग्रामीण भाग अडचणीत आहे. या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मांजरा परिवरांने चांगला ऊसदर देऊन प्रतिकूल परिस्थितीत मदतच केली आहे. या कारखान्यानी शेतकऱ्यांच्या हिताचे केलेले काम हे अमुल्य आहे.
No comments:
Post a Comment