नवी दिल्ली
प्रस्तावित नांदेड-बीदर लातूररोड व्हाया लोहा अहमदपूर चाकूर या रेल्वे मार्गाला गती द्यावी अशी आग्रही मागणी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या कडे आमदार विनायकराव पाटील व आमदार सूधाकरराव भालेराव यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
नांदेड बीदर या नविन रेल्वे मार्गाची घोषणा करण्यात आली होती.दरम्यान नांदेड- लातूर रोड व्हाया लोहा अहमदपूर असा मार्ग मंजुरी साठी या भागात मोठे अंदोलन झाले.या नंतर या मार्गाच्या सर्व्हेक्षणास मंजुरी देण्यात येवून सर्वेक्षणाला निधीही मंजूर करण्यात आला.या कामाला साधारणतः 2035 कोटी खर्चाचे अंदाज पत्रक करण्यात आले.मात्र या पूढे गेल्या कांही महिन्यापासून रेल्वेकडून कसलीच कार्यवाही होत नसल्याची बाब नुकतीच दिल्ली येथे आ. विनायकराव पाटील यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
हा मार्ग इतर मार्गाच्या तुलनेत कमी खर्चिक आहे.व्यापार उद्योग धंदे वाढण्यासाठी रेल्वे मार्गाची खूप गरज असून या भागातील मागासलेपणाचा कलंक पूसून टाकण्यासाठी या रेल्वे मार्गाची महत्वाची भूमिका असनार आहे.हा रेल्वे मार्ग झाल्याने तिरूपती,पंढरपूर,तूळजापूर,औंढा नागनाथ आदी तीर्थ क्षेत्र रेल्वे मार्गाने एकमेकांस जोडला जाणार आहे.या भागात शेतक-यांनी पिकविलेल्या शेती मालास मोठी बाजारपेठ मिळून शेतक-यांच्या जीवनात आर्थीक क्रांती घडविनारा मार्ग आहे. त्या मूळे या मार्गाला गती द्यावी असे पूढे निवेदनात म्हटले आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment