याचा टोनर म्हणून तेलकट त्वचेसाठी उपयोग होऊ शकतो. यासाठी थोड्याशा कच्च्या दुधात काही थेंब लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण चेहरा आणि मानेला लावा आणि काही वेळाने गरम पाण्याने धुवा.
त्वचा साफ करण्यासाठीही तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करू शकता. यासाठी दुधात थोडासा मध मिसळून चेहऱ्याला लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल.
तुम्हाला ब्लॅकहेड्सची समस्या असेल, तर कच्च्या दुधात गव्हाचा जाडा रवा मिसळा. याची पेस्ट करून चेहऱ्यावर लावा. ब्लॅकहेड्स दूर होतील.
चेहऱ्याला उजाळा आणण्यासाठी कच्च्या दुधात चंदन पावडर मिसळून चेहऱ्याला आणि मानेला लावा. त्यानंतर थंड पाण्याने धुवा. काही दिवसांतच चेहऱ्यावर तजेला येईल.कच्च्या दुधाचा वापर क्लिंझर म्हणूनही केला जाऊ शकतो. चेहऱ्यावरील तेल, चिकटपणा, ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर फायदेशीर आहे.
चेहरा सुंदर दिसण्यासाठी ्त्रिरया काय करत नाहीत. महागातील महाग उत्पादनांचा वापर केला जातो. आठवड्यातून दोन वेळा पार्लरला जातात, मात्र ही केमिकल उत्पादने तुमच्या चेहऱ्यासाठी नुकसानकारक असतात. तुमचा चेहरा सुंदर बनविण्यासाठी तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करू शकता. कच्चे दूध चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम यासारखी तत्त्वे असतात. .

No comments:
Post a Comment