रूसा कडून दयानंद विज्ञान महाविद्यालयास 2 कोटीचे अनुदान

Friday, October 5, 2018

लातूर :प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या (रूसा) इन्फॉस्ट्रक्चर ग्रॅन्ट टू कॉलेज’ या योजने अंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयापैकी दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर या महाविद्यालयास दोन कोटी रूपयांचे अनुदान नुकतेच मंजूर झालेले आहे. स्वा रा ती मराठवाडा विद्यापीठातंर्गतील दयानंद विज्ञान महाविद्यालय हे नुकतेच प्रकाशित झालेल्या रूसाच्या यादीमधील अनुदानास प्राप्त ठरलेले एकमेव महाविद्यालय आहे, हे महाविद्यालयाचे ठळक वैशिष्ट्य आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांनी दिली.

या अनुदाना अंतर्गत महाविद्यालयातील भौतिक सुविधा प्रयोगशाळेचे नुतनीकरण, ग्रंथालय, मैदान, अद्यावत संगणिकीकरण, विविध संशोधनात्मक उपकरणे, मुला-मुलींची सुसज्ज वसतिगृह अशा अनेक पायाभूत सुविधांचा विकास करून महाविद्यालयीन उच्च शिक्षणाची गुणवत्ता आणखीन वृध्दिंगत करण्यात येणार आहे. सदरील अनुदानासंदर्भात महाविद्यालयाने प्रस्ताव सादर केला तेव्हा महाविद्यालयाच्या शैक्षणिक व इतर बाबींची गुणवत्तांचे असे सर्व निकष लावून रूसाने 2 कोटीच्या अनुदानास मंजूरी दिली आहे. म्हणजेच, नॅकप्रमाणेच अशा प्रकारचे अनुदान प्राप्त करण्यासाठी विशेष निकष लावले जातात. त्या सर्व निकषानुसार दयानंद विज्ञान महाविद्यालयास हे अनुदान मंजूर झाले आहे.

या अगोदर दयानंद विज्ञान महाविद्यालयास नॅक तर्फे अ’ दर्जा, स्वाराती मराठवाडा विद्यापीठातर्फे उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, विद्यापीठ अनुदान आयोगाचा कॉलेज वूईथ प्रोटेंशन एक्सलन्स’ भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा फिस्ट”, स्वाराती विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार असे नामांकित बहूमान व पुरस्कार मिळालेले आहेत. या अनुदानामुळे भारताच्या अनेक महाविद्यालयापैकी दयानंद विज्ञान महाविद्यालय हे स्वतंत्र विज्ञान शाखेचे महाविद्यालय म्हणून क्रमवारीत अव्वल स्थानामध्ये रूपात नावारूपाला आले आहे. सदरील अनुदान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड व समन्वयक डॉ. राहूल मोरे यांच्या अथक प्रयत्न व परिश्रमातून प्राप्त झाले आहे.

ह्या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष मा. श्री. अरविंदरावजी सोनवणे, सचिव मा. श्री. रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव मा. श्री. सुरेशजी जैन, उपप्राचार्य डॉ. एस. एस. बेल्लाळे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेत्त्र कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment