हिंगोली/प्रतिनिधी
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुजरात राज्य प्रभारी तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खा.राजीव सातव यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली शहरात दंत व आरोग्य तपासणी शिबीर, डॉ. एकबाल उर्दु स्कुल मध्ये शालेय साहित्य वाटप तर अंध विद्यालयात फळ वाटप करण्यात आले.
हिंगोली शहरात 21 सप्टेंबर रोजी दिवसभर वाढदिवसानिमित्त खाकीबाबा इंग्लिश स्कुल येथे विद्यार्थ्यांची दंत तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबीराचे उदघाटन कळमनुरीचे आ. डॉ. संतोष टारफे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष सुरेशअप्पा सराफ, संचालक किशोर सोनी, बाळासाहेब नाईक, विकास टाले, माजी नगराध्यक्ष सुधीर सराफ, डॉ.मनिष बगडीया यांची उपस्थिती होती.
या शिबीरासाठी दंत महाविद्यालयातील डॉ. सौ. श्वेता आचार्य यांच्यासह दंतरोगतज्ञानी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली. यानंतर मोहम्मदीया इंग्लिश स्कुल आझम कॉलनी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची तपासणी अस्थिरोग तज्ञ डॉ.मनिष बगडीया, बालरोगतज्ञ डॉ.नितीन अग्रवाल, डॉ.मनिष मुपकलवार, नेत्ररोग तज्ञ डॉ.निलेश गुंडेवार यांनी केली. यानंतर डॉ. एकबाल उर्दु स्कुल मध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तर अंध विद्यालयात फळ वाटप करण्यात आले.
तसेच विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्त आयोजीत कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ, हिंगोली तालुकाध्यक्ष शामराव जगताप, शहराध्यक्ष बापुराव बांगर, नप गटनेते शेख नेहाल, नगरसेवक अनिल नैनवाणी, माबुद बागवान, आरेफ लाला, नजीर पठाण, विलास गोरे, बासीत मौलाना, मुजीब कुरेशी, मुजीब पठाण, राजेश बगडीया, डॉ.माणिक देशमुख, शासन कांबळे, आसीफ मौलाना, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष जुबेर मामु, हिंगोली विधानसभा युवक अध्यक्ष बंटी नागरे, नितीन होकर्णे शेख तोफीक आदींची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment