५५ दिवस चालणार तुळजाभवानी देवीचा नवरात्र व पौर्णिमा उत्सव

Saturday, September 22, 2018

१० आक्टोबरला घटस्थापना तर २३ आक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा

तुळजापूर दि २१ डाॅ.सतीश महामुनी 
संपुर्ण राज्यभर साजरा होणारा शारदीय नवरात्र महोत्सवाची घटस्थापना १० आक्टोबरला होउन नवरात्राला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रापुर्वी देवीची मंचकी निद्रा २ आक्टोबर पासून सुरु होत आहे. नवरात्राची कार्यक्रम पत्रिका मंदिर संस्थानकडून अधिकृतपणे प्रसिध्द करण्यात आली आहे.

शारदीय नवरात्र महोत्सव हा राज्यातील प्रमुख उत्सव असून त्याची सुरुवात होण्यापुर्वीची तयारीला वेग आला आहे, तुळजाभवानी मंदिर संस्थानने आपल्या प्रषासकीय बैठका व यात्रेशी निगडीत विविध घटक यांना सोबत घेवून पुर्व तयारीची मुख्य बैठक जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. सदर बैठकीत विविध खाते प्रमुखांना त्यांची कर्तव्ये व नियोजन याबाबत जिल्हाधिकारी यांनी विविध सुचना केल्या.


धार्मिक कार्यक्रमात २ आक्टोबर पासून मंचकी निद्रा, १० आक्टोबर रोजी घटस्थापना उत्सव, १३ आक्टोबर रोजी ललिता पंचमी व रथालंकार महापुजा तसेच रात्री १० वाजता छबीना उत्सव, १४ आक्टोबर रोजी मुरली अलंकार महापुजा व रात्रीचा छबीना, १५ आक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापुजा व छबीना, 16 आक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापुजा व छबीना, १७ आक्टोबर रोजी दुर्गाष्टमी असून यादिवशी महिषासुरमर्दिनी अलंकार महापुजा व छबीना याच दिवशी सकाळी ८ वाजता वैदिक होमाला सुरुवात दुपारी १२ वाजता पुर्णाहूती होईल रात्री १० वाजता छबीना पार पडेल.

१८ आक्टोबर रोजी महानवमी असून नित्योपचार पुजेनंतर दुपारी १२ वाजता होमकुंडावरील धार्मिक विधी होईल, याप्रसंगी अजाबळी उत्सव पार पडणार आहे. यादिवशी रात्रभर मंदिरात कार्यक्रमाची रेलचेल चालू असून १९ आक्टोबर पहाटे चार वाजता तुळजाभवानीची मुख्य मुर्ती बाहेर आणली जाईल. 

भिंगारच्या पालखीत बसून तीचे सिमोलंघ्घन संपन्न होईल. त्यानंतर तुळजापूरकरांचे सिमोलघ्घन सायंकाळी होईल. या सिमोलंघ्घनानंतर देवी नगरच्या पलंगावर श्रमनिद्रा घेईल. ही निद्रा २३ आक्टोबर रोजी असणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेदिवशी पुर्ण होईल तत्पुर्वी मध्यरात्री देवीची मुर्ती चांदीच्या सिंहासनावर प्रतिस्थापित करण्यात येईल. देवी झोपलेली असेल त्याकाळात तुळजापूरातील सर्व घरातील पलंग, गादया, उशा याचा उपयोग केला जात नाही. नवरात्रा पुर्वी सर्व शहरातील प्रत्येक घराघरात स्वच्छता करण्यात येते, सर्व कपडे, भांडे, साहित्य व भींती यांची स्वच्छता केली जाते. 

२४ आक्टोबर रोजी सोलापूरच्या शिवलाड तेली समाजाच्या काठया तुळजाभवानीच्या यात्रेमध्ये सहभागी होतील, या काठयासोबत देवीचा छबीना उत्सव साजरा केला जाईल. नवरात्रीतील राज्यस्तरीय कुस्तीची परंपरा मंदिर संस्थान कडून बंद करण्यात आली आहे त्यामुळे कुस्तीच्या कार्यक्रमाचा उल्लेख या कार्यक्रम पत्रिकेत केला नाही

No comments:

Post a Comment