सन्मानाने मरण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार: सरन्यायाधीश

Sunday, September 9, 2018

पुणे: 
कायद्याने कुणालाही आत्महत्या करता येत नाही. मात्र प्रत्येकाला सन्मानाने मरण्याचा अधिकार असल्याचा पुनरुच्चार दीपक मिश्रा यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी इच्छामरणाबाबत अत्यंत महत्त्वाचं भाष्य केलं आहे.  पुण्यात 'बॅलन्सिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनल राइट्स' या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

एखादी व्यक्ती स्वत:साठी लिविंग विल तयार करू शकते, असं दीपक मिश्रा व्याख्यानमालेत म्हणाले. 'एखाद्या व्यक्तीला कधीही बरा न होणारा आजार झाला असेल आणि त्यामुळे त्या व्यक्तीला इच्छामरण हवं असेल, तर ती व्यक्ती स्वत:साठी लिविंग विल तयार करु शकते. आपण शेवटचा श्वास कधी घ्यायचा, हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. यासाठी त्या व्यक्तीवर कोणताही दबाव नसावा,' असं सरन्यायाधीशांनी म्हटलं. 

सर्वोच्च न्यायालयाने ९ मार्च रोजी इच्छामरणाबाबत निकाल दिला होता. हा निकाल देताना इच्छामरणाच्या मृत्यूपत्राबाबत मार्गदर्शकतत्त्वही घालून दिले होते. कोर्टाने लोकांना सन्मानाने मरण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं होतं. त्याचा मिश्रा यांनी पुनरुच्चार केला. 

No comments:

Post a Comment