नवी दिल्ली : सातत्याने डॉलरच्या तुलनेत होत असलेल्या रुपयाच्या घसरत्या मूल्यामुळे कंपन्यांच्या आर्थिक हिशेबाचा डोलारा कोलमडू शकतो, त्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. याचे कारण अनेक मोठ्या कंपन्या कर्ज घेतात, त्या डॉलरमध्ये व पैसे कमावतात रुपयामध्ये, अशा कंपन्यांना मात्र या स्थितीला तोंड द्यावे लागत आहे. मात्र ही स्थिती मर्यादित राहील, असे मूडिज इनव्हेस्टर स्व्हिहसच्या नोंदीमध्ये नमूद केली आहे.
या वर्षामध्ये रुपया १३ टक्के घसरून त्याचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ७२.५० रुपये असे झाले आहे. ज्या कंपन्यांमध्ये अशी स्थिती असते, तेथे प्रामुख्याने परकीय चलनाच्या दरामध्ये चढ-उतार असण्याची जोखीम असते व त्याबाबत त्या कंपन्या संरक्षितही असतात. यामध्ये काही कंपन्यांची कमाई ही डॉलरमध्ये असते, तर काही कंपन्या भविष्यातील वायदे व पर्याय यांच्या सौद्यांमध्ये आपला व्यवहार साधत असतात. भारतात उच्च गुंतवणूक श्रेणीमध्ये मूडिज २४ कंपन्यांचे पतमानांकन करत असते.
यामध्ये १२ कंपन्यांचे उत्पन्न हे डॉलरमध्ये आहे. त्याच्याकडील २४ कंपन्यांमध्ये आयटी, तेल व नैसर्गिक वायू, रसायन, वाहन, पोलाद व रियल इस्टेट या क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांबाबत त्यामुळेच सध्याच्या स्थितीत काहीसे वेगळे वातावरण आहे. आर्थिकतेचा डोलारा सांभाळण्यासाठी सर्वांना कसरत करावी लागत आहे. मात्र, विशेष करून ज्यांचे उत्पन्न हे रुपयामध्ये आहे, त्यांना कसरत करावी लागणार आहे; पण हा काळ फार नसेल, असे मूडिजचे म्हणणे आहे..

No comments:
Post a Comment