स्टॅटिस्टा या मार्केट रिसर्चर कंपनीच्या माहितीनुसार २०११ मधील लोकसंख्येच्या जवळजवळ अर्धी लोकसंख्या २०१८ मध्ये या ऑनलाईन डेटिंग कंपन्यांचे ग्राहक झालेली आहे. केवळ इतकेच नव्हे तर या व्यवसायातून २०१८ मध्ये असणारी कमाई १ कोटी डॉलरवर गेलेली आहे. येत्या चार वर्षांमध्ये त्यांचा महसूल आणखी दहा टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेच्या तुलनेत ही आकडेवारी पाहता महसूल व संख्या कमी आहे. तेथे हा बाजार सुमारे ६० कोटी डॉलरचा आहे.
नवी दिल्ली : भारतामध्ये ऑनलाईन विवाह जुळवणाऱ्या अनेक कंपन्या चांगल्याच तेजीत असून त्यांचा फायदाही वाढत असल्याचे दिसून येत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात ८ कोटीपेक्षा अधिक लोक अविवाहित होते व त्यांना आपला जीवनसाथी शोधायचा होता. अशावेळी ऑनलाईन डेटिंगची सुविधा उपलब्ध करणाऱ्या कंपन्यांना या ८ कोटी लोकांमध्ये आपले ग्राहक दिसले व त्यांनी पाहता पाहता या ऑनलाईन डेटिंगचा एक मोठा बाजार तयार केला.
२०११ पासून अमेरिका व अन्य पश्चिमी देशांमध्ये या प्रकाराने केव्हाच जनमनाचा कब्जा घेतला होता. त्या वेळी त्या कामासाठी स्टार्टअप्सही निघत होते व त्यांनी या ऑनलाईन डेटिंगच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात पैसाही कमावला होता. त्यांच्या ॲप्सद्वारे अनेकांना दोस्त मिळाले, जीवनसाथी सहज हुडकता आले, पती-पत्नी म्हणूनही सहजपणे परस्परांना पसंत करणे सोयीस्कर झाले होते. वास्तविक भारतात ऑनलाईन डेटिंगचा हा बाजार सुरुवातीला चांगला मानला जात नव्हता, स्वीकारला गेला नव्हता, मात्र तो सुरुवातीचा काळ होता. आज मात्र स्थिती खूप बदलली आहे. आज देशात टिंडर, ट्रुलीमैडली, आयक्रशआयफ्लश अशा ॲप्सनी ८ कोटींपेक्षा जास्त लोकांचा ग्राहक म्हणून पाठपुरावा मिळवला आहे. ही संख्या वाढती आहे व ती लक्षात घेऊन त्या अनुषंगाने खास बिझनेस मॉडेलही तयार केले जात आहे.
भारतामध्ये अजूनही काही प्रमाणात लोक ऑनलाईन डेटिंगकडे वळत आहेत. ऑनलाईन पर्याय पाहण्यामध्ये त्यांना मानसिक तयारी नसल्याने त्या पर्यायाचा विचार न करणारेही लोक आहेत. अर्थात या पर्यायाकडे बिनधास्तपणे येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे व वाढत आहे. कायम वा तात्पुरत्या स्वरूपात आपल्या साथीच्या शोधासाठी लोक ऑनलाईन डेटिंगसाठी पर्याय धुंडाळत असतात. यामध्ये टिंडर हे ॲप लोकप्रिय असून त्यांचा भारतात एका महिन्याचा महसूल आहे एक-दोन कोटी रुपये. येत्या काळात स्थानिक भाषांमध्येही आपली उत्पादने हे सादर करणार आहेत. ट्रुली मॉडेल हे ॲप दहा प्रमुख शहरांमध्ये आहेच, यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी व नोकरदार वर्ग आकर्षला गेला आहे. मुलींपेक्षा मुले या पर्यायाचा विचार अधिक करत आहेत. भारतीय भाषांमध्ये हे ॲप तयार झाले तर त्या संख्येत अधिक वाढ होईल, असे ऑनलाईन डेटिंग कंपन्यांना वाटते. इतकेच नव्हे तर २०२२ पर्यंत या कंपन्यांच्या संख्येत दुप्पट वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे..

No comments:
Post a Comment