ट्रकच्या धडकेत दोघे ठार

Wednesday, September 12, 2018

अर्धापूर /प्रतिनिधी.

अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील रहिवासी नंदकुमार संभाजी कदम (२२), युनूस इक्बाल शेख (२७) व अरबाज इक्बाल शेख (१९) हे तिघे बुलेट क्रमांक एम.एच. २६ बी.एच. ४१३७ वर बसून नांदेडकडे येत होते. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास खडकुत पाटीजवळ राँग साईडने आलेल्या ट्रकने बुलेटला समोरुनभरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत बुलेटवरील दोघे जण ठार तर एक जण जखमी झाला आहे.

 ही घटना नांदेड-नागपूर महामार्गावर खडकूत पाटीजवळ घडली. महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने ट्रक चालक फोरलेन ट्रॅकऐवजी विरुद्ध दिशेने जात होता. त्यामुळे हा अपघात होण्यास रस्त्यावरील खड्डे कारणीभूत ठरल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. .जोराची धडक दिली. अपघातात नंदकुमार कदम हा जागीच ठार झाला तर युनूस इक्बाल शेख याने उपचारादरम्यान रुग्णालयात प्राण सोडले. युनूसचा लहान भाऊ अरबाज शेख हाही गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 

ट्रकचालकास अर्धापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नांदेड-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग नावालाच उरला आहे. चार पदरी रस्त्याची देखभालीअभावी पुरती चाळण झाली आहे. जागोजाग पडलेल्या खड्डयाने मार्ग कसा काढावा असा प्रश्न वाहनधारकांना पडतो. पिंपळगाव पाटीपासून भोकर फाट्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची तर पुरती वाताहत झाली आहे. त्यामुळे दुचाकी व अवजड वाहने चुकीच्या दिशेने धावत आहेत. रस्ता सुस्थितीत असता तर आजचा अपघात टळला आहे. अपघातातील बळी वाहनांचा नसून खड्डयाचा असल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती.

No comments:

Post a Comment