एक गाव, एक गणपती' संकल्पना राबवा पोलीस अधीक्षक यांचे आवाहन

Wednesday, September 12, 2018


कळमनुरी / प्रतिनिधी.
सणोत्सव साजरे करतांना सर्व समाजाने त्यामध्ये सहभागी होवून भाईचारा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गणेशोत्सव हा सण सर्वांनी मिळून साजरा करावा आणि तालुक्यातील ५२ गावात 'एक गाव, एक गणपती' संकल्पना राबवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी केले

कळमनुरी येथील पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि.११) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, पोलीस उपअधीक्षक राहुल मदणे, नायब तहसीलदार पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक योगेश कुमार म्हणाले की, गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश हा सर्वांनी एकत्र येणे, एकमेकात भाईचारा निर्माण करणे होय. परंतु, मागील काही वर्षांपासून या उत्सवाचा मूळ उद्देशच बाजूला सारण्यात येत असल्याचे चित्र आहे. सणोत्सवाचा उद्देश बाजूला सारल्या गेल्यास त्यास अर्थ उरणार नाही. त्याकरीता गणेशोत्सवात सर्वांनी एकत्र येवून साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. 


No comments:

Post a Comment