अशी असावी बॅकपॅक

Wednesday, September 12, 2018

तुम्हाला भटकंतीची आवड असेल तर सोबत उत्तम बॅकपॅकही हवीच. पण अनेकदा चुकीची बॅकपॅक निवडून पश्चात्ताप करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. स्टायलिंग आणि कम्फर्ट या दोन्ही बाबी साधायच्या तर बॅकपॅक निवडीसंबंधीच्या काही टिप्स तुम्ही फॉलो करू शकता. 

जुन्या पद्धतीच्या बॅकपॅकमध्ये पुढे एकच कप्पा असतो. या कप्प्यातलं सामान पटकन हाताला लागतं. आता पुढे एक किंवा दोन मोठे कप्पे असतात. या कप्प्यांमध्ये तुम्हाला हवं ते सामान ठेवता येतं. काही लोकांना अशी बॅग चालते. पण आपल्याला थोडा जास्त नेटकेपणा हवा असतो. यासाठी वेगवेगळे कप्पे असणारी आणि सामानासाठी भरपूर जागा असलेली बॅग असायला हवी. 

बॅकपॅक पाठीवर घेऊन फिरावं लागतं. त्यामुळे तिचा आकार महत्त्वाचा ठरतो. उभट आणि लंबगोल आकाराची बॅगपॅक आरामदायी असते. यात वजनाची समान विभागणी होते. स्टाईलच्या बाबतीत तर नो कॉम्प्रोमाईज! अशी बॅग पाठीवर घेतल्यानंतर पाठ आणि बॅग यांच्यात थोडं अंतर राहतं. यामुळे हवा खेळती राहून पाठीला थंडावा मिळतो. 

कॉम्पॅक्ट पण भरपूर जागा असणारी, टिकाऊ आणि विविध कप्पे असणारी बॅकपॅक घेणं योग्य ठरतं. यामुळे तुम्हाला दुसरी बॅग घेण्याची गरज भासत नाही. बॅगचं मटेरियल जाड पण वजनाने हलकं असायला हवं. ती १०० टक्के वॉटरप्रूफ असायला हवी.

No comments:

Post a Comment