दिवाकर रावतेंनी दिली कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव भेट

Wednesday, September 12, 2018

मुंबई : लिपिक-टंकलेखक पदासह वर्ग-३ मधील बढतीमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना २५ टक्के आरक्षण मुंबई- एसटीने प्रवास करणाऱ्या राज्यातील जनतेला चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देतानाच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांनादेखील चांगल्या सुविधा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गणेशोत्सव एका दिवसावर आलेला असताना आपल्या क र्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित करणारी भेट देऊ केली आहे.

 एसटी महामंडळात सुमारे १ लाख ४ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी ६० ते ७० हजार कर्मचारी चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई अशा विविध चतुर्थ श्रेणी पदावर कार्यरत आहेत. आतापर्यंत अनेक कर्मचारी एकाच पदावर रुजू होऊन, ३०-३५ वर्ष सेवा बजावून त्याच पदावर निवृत्त झाले आहेत. दरवर्षी नित्यनियमाने मिळणारी वेतनवाढ सोडली, तर त्यांना वरिष्ठ पदावरील बढती प्रक्रियेत कोणतेच स्थान नव्हते. यापुढे या कर्मचाऱ्यांना प्रचलित नियमाप्रमाणे शैक्षणिक अहर्ता व सेवा ज्येष्ठतेनुसार लिपिक-टंकलेखक पदासह वर्ग-३ मध्ये बढती दिली जाणार आहे. वर्ग-३ पदाच्या एकूण भरती प्रक्रियेतील २५ टक्के जागा अशा प्रकारे भरण्यात येणार आहेत. गणपती उत्सवाच्या निमित्ताने रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना हा सुखद धक्का देत अनोखी भेट दिल्याने कामगारांमध्ये समाधान व्यक्त केले आहे..

महामंडळात सध्या कार्यरत असलेल्या चालक-वाहक, सहाय्यक, शिपाई, या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना येथून पुढे लिपिक-टंकलेखक या पदासह वर्ग-३ मधील बढती प्रक्रियेमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा आणि दिलासा मिळणार आहे. .

No comments:

Post a Comment