एकाच दोरीने विवाहित आत्या-भाचीची आत्महत्या

Sunday, September 2, 2018

कळमनुरी तालुक्यातील महालिंगी तांडा येथील घटना 
हिंगोली / प्रतिनिधी 
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथून जवळच असलेल्या महालिंगी तांडा येथे विवाहित आत्या-भाचींनी आपल्या पतीचे छायाचित्र गळ्यात अडकवून एकाच दोरीने 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील धर्मापूर तांडा हे माहेर असलेल्या निखिता राठोड व सिमा राठोड 19 वर्ष या दोघी आत्या-भाचींचे लग्न कळमनुरी तालुक्यातील महालिंगी तांडा येथे करून देण्यात आले होते. 2 सप्टेंबर रोजी या दोघीही महालिंगी तांडा येथून जवळच असलेल्या घनदाट झाडीकडे धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. बराच वेळ झाल्याने त्या घरी न परतल्याने घरच्यासह ग्रामस्थांनी यांचा शोध घेतला असता या दोघीही एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. या दोघींमध्ये आत्या-भाचींचे नाते होते. या दोघीही सुशिक्षीत होत्या. याबाबत आपली पत्नी सिमा राठोड हिने आत्महत्या केल्याचे कळताच पती बालाजी राठोड यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

 पण वेळीच रूग्णालयात हलविल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. विशेष म्हणजे या दोघींनीही आत्महत्या करण्यापुर्वी आपल्या गळ्यात पतीचे लटकविलेले होते. ही माहिती मिळताचे घटनास्थळी बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी घटनास्थळी तातडीने भेट देवून पंचनामा केला. या दोघींनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप समजले नसून बाळापूर पोलीसांच्या वतीने पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment