निलंगा दि प्रतिनिधी
आ. सुधाकरराव भालेराव म्हणाले की, रूबाबदार, टोलेजंग इमारती व देखणा सोहळा होत आहे. या संपुर्ण विकासाचे मास्टर माईंड हे अरविंद भैय्या उर्फ छोटू पाटील निलंगेकर आहेत. ते खरोबर हिरा आहेत. आज जिल्ह्यात 9 हजार कोटींचे राष्ट्रीय महामार्ग होत आहेत. लवकरच आपल्याला उदगीरात विकास कामांचा शुभारंभ करायचा आहे. देशात नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलला जात आहे. पालकमंत्री अठरा-अठरा, वीस-वीस तास काम करतात. कॉंग्रेसच्या काळात दलाली, भ्रष्टाचार आणि दुकानदारी होती. आज लोकांना ऑनलाईन पैसे मिळतात. सांगा अच्छे दिन आहेत की, नाही. गरज आहे श्रद्धा आणि सबुरीची. श्रद्धा म्हणजे विश्वास, सबुरी म्हणजे विकास. सबका साथ सबका विकास हे छोटु भैय्या यांचे धोरण आहे.
देशातले पाहिले पालकमंत्री- खा. सुनिल गायकवाड
खा. सुनिल गायकवाड म्हणाले की, संभाजीराव पाटील हे देशातील पहिले पालकमंत्री आहेत. त्यांनी विविध पॅटर्न निर्माण केले आहेत. त्यांना भेटलं की, एनर्जी मिळते. कठोर परिश्रम तसेच दुष्काळ मुक्त जिल्हा, कॅन्सरमुक्त जिल्हा ही त्यांची भुमिका आहे.त्याचे विविध उपक्रम महाराष्ट्रभर आणि देशभर राबविले जात आहेत.
अलोट गर्दी प्रचंड उत्साह
सकाळपासूनच निलंगा शहरात अलोट गर्दी होती. प्रचंड उत्साह होता. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वॉटरपु्रप मंडप उभारला होता. सर्व नियोजन दृष्ट लागण्यासारखे होते. या ठिकाणी नदीला पुर आल्यानंतर जसे पाण्याचे लोट येतात तसे जनतेेचे लोट येत होते. निलंगा शहराच्या इतिहासातील अभुतपुर्व उत्साह व अलोट गर्दी असलेला हा कार्यक्रम होता.


No comments:
Post a Comment