निलंगा दि प्रतिनिधी
आपल्या भाषणात बोलताना माजी मंत्री आ. विनायकराव पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी राजेंना ज्या पद्धतीने जिजामातेने संस्कार केले तसे आक्कांचे आपल्यावर संस्कार आहेत. व रामाला लक्ष्मणासारखा जसा भाऊ होता तसा तुम्हाला अरविंद पाटलांसारखा भाऊ आहे. आणि त्यामुळे आज गोकुळअष्टमीच्या मुहूर्तावर तुम्ही विकासाची कामे करत आहात. आणि आक्कांचे स्वप्न पुर्ण करत आहात असं सागून विनायकराव पाटील यांनी एवढी कामे म्हणजे मतदारांची स्वप्नपुर्ती होत आहे
. नियोजन कसं असावं हे जर पहायचं असेल तर अरविंद भैय्यांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. पुर्वीचे लोकप्रतिनिधी काय करायचे ही मी सांगणार नाही. पण पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचे विकासाकडे सुक्ष्म लक्ष आहे.
कलेक्टर साहेब तुमच आमच्याकडे दुर्लक्ष झाले की आम्ही संपलो. महाराष्ट्राला आदर्श बनविण्यासाठी व मराठवाड्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ना. संभाजीराव पाटील प्रयत्नशिल आहेत असंही विनायकराव पाटील म्हणाले. आणि निलंगा विधानसभेतील लोकांना हक्काची व धावून येणारे लोकप्रतिनिधी भेटले आहेत त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

No comments:
Post a Comment