निलंगा दि प्रतिनिधी
यावेळा जिल्हाधिकारी जी.श्रीकांत म्हणाले नऊ वर्षाच्या सेवेत हा पहिला जंबो कार्यक्रम पाहतोय. उज्वला योजनेचं 31 डिसेंबरपर्यत शंभर टक्के काम पुर्ण होईल. 15 हजार कुटूंबियांना घरे म्हणजे 80 हजार लोकांना घरे मिळतील. विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, रोजगार निर्मीतीसाठी रेल्वे बोगी प्रकल्प आहे, असेही जिल्हाधिकारी जी.श्रीकांत म्हणाले.
मी टिसी होतो. आता जिल्हाधिकारी आहे, निलंगा शहरात स्पर्धा परिक्षा केंद्र सुरू करणार, अहमदपूर, उदगीर, औसा येथे हे केंद्र सुरू होतील. लातूर येथे 17 सप्टेंबरला जवळ जवळ दिडशे फुट उंचीवर झेंडा फडकणार, 90 ते 100 फुट उंचीवर झेंडा फडकणार हे सांगत असताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले की, येथे लवकरच स्विमींग टॅंक होईल. आणि होत असलेल्या कामावर मी समाधानी नाही. ये दिल मांगे मोर असं सांगून कोणीही विकासाला आडवं येऊ नये. यावेळा त्यांनी बाहूबली पिक्चरचा संदर्भ दिला.

No comments:
Post a Comment