निलंगा दि प्रतिनिधी
विकासाची बांधिलकी बांधून कठोर परिश्रम व नियोजनातून बांधिलकी बांधणारे ज्यांना कोणी मास्टर माईंड म्हणतंय, ज्यांना अमित शहा म्हणतंय, ज्यांना कोणी विकासाचे शिल्पकार म्हणतंय ते अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले की, येणाऱ्या दोन वर्षात निलंगा शहर हे देशातील दहाव्या क्रमांकाचे शहर असेल. तुमच्यातील प्रेम आणि उत्साह पाहून मला असं वाटतंय की, तुमच्यात समाधान आणि आनंद दिसतोय.
तालुक्यातील 165 पैकी 106 गावे जलयुक्तमध्ये घेण्यात आली. 206 किलोमीटर नाला सरळीकरण करण्यात आलं. पाण्याची पातळी पाच मिटरने वाढली आहे. पुर्वी 200 विहीरी अधिग्रहण करण्यात आल्या. आज एकही टॅंकर लावावे लागले नाही, 395 कामाचे भुमिपूजन आज होत आहे. 192 शाळांपैकी 157 शाळा डिजीटल झाल्या. इंद्रप्रस्थ जलभुमि अभियानाची कामे सुरू आहेत, 27 हजार शोषखड्यांचे टार्गेट होते, 14 हजार पुर्ण झाले. राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, पांदण मुक्त गाव व रस्त्याची कामे केली जात आहेत. जिल्ह्यात 3 वर्षात 151कोटी पिक विमा आला. नैसर्गिक आपत्तीचे 131 कोटी आले, 325 कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले.
वेगवेगळ्या योजनाबरोबरच घरकुलाचे कबाले देण्याचा प्रश्न, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व पन्नासपेक्षा जास्त खुल्या जागेवर वृद्ध आणि बालकांसाठी आपण ओपन जिम करत आहोत. देशात शौचालयाचे शंभर टक्के काम पुर्ण करणारा हा भाग आहे. येणाऱ्या दोन वर्षात भारतात दहाव्या क्रमांचे गाव व शहर निलंगा राहिल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री फडणवीसजी यांच्या नेतृत्वात व अटलजींच्या प्रेरणेने विकासाचा वेग वाढविला जातोय. आणि जाणीवपुर्वक गोकुळअष्टमी म्हणजे कृष्ण जन्माच्या मुहूर्तावर हे कामे व आजचा दिवस निवडण्यात आला.
No comments:
Post a Comment