तुमचा आशिर्वाद आणि सहकार्य राहू द्या मराठवाड्याचा चेहरा-मोहरा बदलणार-पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर

Sunday, September 2, 2018

निलंगा / प्रतिनिधी 
लातूर जिल्हा दुष्काळमुक्त जिल्हा, कॅन्सरमुक्त जिल्हा व अंधत्व निर्मुलन करणारा जिल्हा बनविणार व मराठवाड्याचा चेहरा-मोहरा बदलणार, असे भावपुर्ण उद्‌गार लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे कामगार कल्याणमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी काढले. यावेळा तहसीलची प्रशासकीय इमारत, पंचायत समितीची इमारत व निलंगा तालुक्यातील अडीचशे कोटींच्या विकास कामांच्या भुमिपुजन प्रसंगी ते बोलत होते.

 यावेळा व्यासपीठावर माजी खा. रूपाताई पाटील आक्का, आ. विनायकराव पाटील, आ.सुधाकर भालेराव, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी इटणकर, अरविंद पाटील निलंगेकर, रमेश कराड, नागनाथ अण्णा निडवते, शैलेश लाहोटी, मिलींद लातूरे, राम ठिनके, संजय दोरवे, प्रकाश देशमुख, ऍड. मिलींद पाटील, चंद्रकांत बिराजदार, भगवानराव पाटील, अंकू पाटील, भगवानराव पाटील नरेगावकर, उपजिल्हाधिकारी गव्हाणे, आगे पाटील, गणेश हाके, समाज कल्याण संभापती संजय दोरवे, कृषि सभापती बजरंग जाधव, महिला बालकल्याण सभापती घुले, गोविंद केंद्रे आदींची उपस्थिती होती. 

आपल्या अभ्यासपुर्ण व ह्दयस्पर्धी भाषणात बोलताना ना. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, आपण लातूर जिल्हा दुष्काळमुक्त, कॅन्सरमुक्त व अंधत्वमुक्त करणार आहोत. दोनशे पन्नास कोटींची विकास कामे फक्त निलंगा तालुक्याची आहेत. शिरूर अनंतपाळ तालुका 175 कोटी, देवणी तालुका 180 कोटी च्या विकास कामाचे लवकरच उद्‌घाटन करायचे आहे, असे सांगून मराठवाड्याकडे महाराष्ट्राचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. स्टॅंड अप कॉमेडीच्या संदर्भात उदाहरण देताना ना. निलंगेकर म्हणाले की, मुलगा व्यासपीठावर उभा राहतो आणि म्हणतो सांगा माझा चेहरा पहा सांगा मी कुठला आहे. यावर हा दुष्काळी चेहरा हा लातूर जिल्ह्याचाच असणार असं सांगून या जिल्ह्यात 600 टॅंकर लावले होते. रेल्वेने पाणी आणले जायचे, आपण टॅंकरमुक्त जिल्हा केलाय हे फक्त तुमच्या मतामुळे घडले. 

पुणे येथे मराठवाडा मित्र मंडळाच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. मला सांगण्यात आले सर्वत्र मराठवाडयाची सुन पाहिजे, पण मराठवाड्याला मुलगी द्यायला कोणी तयार होत नाही याचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे. 

लोकांना इमारती रूबाबदार झाल्या, सर्वसामान्यांना सन्मान द्या.
पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील म्हणाले की, इमारती देखण्या व रूबाबदार झाल्या, याचं कौतुक मला शुन्य आहे. येथे बसणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्यांना प्रेमाने, विश्वासाने वागविणे गरजेचे आहे, तरचं खरा विकास होईल. 2014 पुर्वीचे चित्र आठवा आज जिल्ह्यामध्ये 9 हजार कोटीचें राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब आणि सर्वसामान्यांसाठी विविध महत्वपुर्ण योजना काढल्या आहेत, असं सांगून आपणास येणाऱ्या काळात भुगर्भातील पाण्याची पातळी साडे आठ ते नऊ मीटर वाढविण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, जलयुक्तची कामे झाली व सुरू आहेत, वॉटर कपची कामे सुरू आहेत. 30 सप्टेंबरला आपणास जैन समाजाच्या वतीने जवळ जवळ 300 मशीनरी मिळणार आहेत. त्या द्वारे आपणास जलयुक्तची कामे करायची आहेत. 30 सप्टेंबरला खिल्लारे येथे कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांना निमंत्रण दिले आहे, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले आहेत. हे सर्व जे घडत आहे, ते तुमचे प्रेम आणि मताच्या आशिर्वादामुळे. 

महाराष्ट्रात सर्वाधिक पैसा निलंगा तालुक्यात 
महाराष्ट्रात सर्वांत अधिक पैसा हा निलंगा तालुक्याला आणला आहे. जे सत्तर वर्षात घडले नाही, ते घडत आहे, घडवायचे आहे, असंही त्यांनी सांगितले. 
.
कशासाठी काळे झेंडे 
कार्यक्रम पत्रिकेत माझे नाव नाही म्हणून काळे झेंडे दाखविण्याची प्रवृत्ती थांबली पाहिजे, असंही ना. निलंगेकर म्हणाले. 
दिलेला शब्द पाळणार 
मी दिलेला शब्द पाळतोय आणि भविष्यातही पाळणार उद्याच्या उज्वल भविष्यासाठी राष्ट्रीय महामार्गाबरोबर मी लातूर रोड ते गुलबर्गा रेल्वे करणारे म्हणजे करणारं. माझ नाव संभाजी आहे मी दिलेला शब्द पुर्ण करतोय. माझी चार वर्षाची आमदारकी, दोन वर्षाचे मंत्री, मी कुणालाही त्रास दिला नाही. सकारात्मक दृष्टीकोणातून मी काम करतोय. तुमच्या आशिर्वादाने मी 37 साव्या वर्षी मंत्री झालो. माझ्या गावात माझे घर नव्हते. मी घराबाहेर पडलो, जनतेने सावरले, आशिर्वाद दिले, आमची दारं सर्वांसाठी खुली आहेत. तुमचा आशिर्वाद असू द्या मराठवाड्याचा चेहरा-मोहरा बदलेल. 

निळकंठेश्वराची पुण्याई 
मुख्यमंत्र्याचा हेलीकॉप्टरचा अपघात झाला. बाजूला डिपी होती. काहीही नुकसान झाले नाही हे जे घडलं ते निळकंठेश्वराचा आशिर्वाद आणि जनतेचे प्रेम यामुळे असंही यावेळा भावपुर्ण उद्‌गार काढून ना. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले, तुम्ही मला एवढे दिल. त्यामुळे माझ्या रक्ताचा शेवटच्या थेंबापर्यंत मी तुमच्याशी बांधील आहे. 


No comments:

Post a Comment