विमान सेवेतील संधी

Sunday, September 2, 2018

पूर्वी विमान प्रवास हे बहुतेकांसाठी स्वप्न असायचं. केवळ गर्भश्रीमंतच विमानानं प्रवास करू शकतात, अशी धारणा होती आणि त्यात चुकीचं काही नव्हतं. कमी वेतनात प्रपंच भागवणं अनेकांसाठी कठीण असायचं, तिथं तिकिटासाठी भली मोठ्ठी रक्कम कुठून येणार? मात्र आता ही परिस्थिती राहिलेली नाही. याचं महत्त्वाचं कारण विमान कंपन्यांचे प्रवासाचे दर आवाक्यात आले आहेत. अशा स्थितीत या क्षेत्रातील कारकीर्दीचा विचार अवश्य व्हायला हवा. यात भरपूर पगाराची नोकरी देणारा व्यवसाय म्हणजे विमानाची देखभाल. हा व्यवसाय किती वाढत चालला आहे याची आपल्याला कल्पना नसते. आज जगातल्या विविध देशांकडे मालाची आणि प्रवाशांची वाहतूक करणारी निरनिराळ्या प्रकारची लाखो विमानं आहेत. त्याचबरोबर काही बड्या उद्योगपतींनी आणि व्यापक संपर्क असलेल्या कंपन्यांनी स्वत:ची छोटी विमानं घेतली आहेत. जगात अशा छोटवा विमानांची संख्याही लाखोंच्या घरात आहे, हे लक्षात घ्यायला हवं. साहजिक या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाला वाढती मागणी प्राप्त होत आहे.

मात्र या क्षेत्रातील दुसरी शाखा म्हणजे विमानांची देखभाल. या संदर्भातील प्रशिक्षणासाठी तुलनेनं कमी खर्च येतो. विमानाची देखभाल करणाऱ्यांसाठी मोठा अभ्यासक्रम नाही. परंतु काही संस्थांचे छोटे अभ्यासक्रम आहेत आणि ते अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डायरेक्टर ऑफ जनरल अ‍ॅण्ड सिव्हील एव्हिएशन या संस्थेचं परवाना कम् प्रमाणपत्र मिळवावं लागतं. हे प्रमाणपत्र देणाऱ्या काही संस्थांची माहिती असणंही गरजेचं आहे. या संस्था म्हणजे १) स्कूल ऑफ एव्हीएशन सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, इंडियन इ्स्टिटट्यूट ऑफ एअरोनॉटिक्स अ‍ॅण्ड इंडियन इ्स्टिटट्यूट ऑफ एअरोनॉटिकल सायन्स, नवी दिल्ली, २) फ्लायटेक एव्हिएशन अ‍ॅकॅडमी, इ्स्टिटट्यूट ऑफ एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीयरिंग, राजीव गांधी एव्हिएशन अ‍ॅकॅडमी अ‍ॅण्ड हैदराबाद कॉलेज ऑफ एव्हिएशन टेक, हैदराबाद., ३) एअरोनॉटिकल ट्रेनिंग इ्स्टिटट्यूट, लखनौ, ४) व्हीएसएम एअरोस्पेस अ‍ॅण्ड हिंदुस्थान एव्हिएशन अ‍ॅकॅडमी, बंगळुरू. या साऱ्या माहितीवरून या क्षेत्रातील कारकीर्दीचा विचार अवश्य केला जायला हवा.

मुख्यत्वे विमान कंपन्यांमध्ये विमानांच्या देखभालीचा भाग महत्त्वाचा ठरतो. साहजिक विमानाच्या देखभालीचं शिक्षण घेणं उपयुक्त ठरतं. भारतातील विविध विमान कंपन्यांनाही अशा कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. या क्षेत्रात उत्तम वेतन प्राप्त होत असल्याने त्याकडे अधिक संख्येने इच्छुकांचा ओढा असणं साहजिक आहे. या संदर्भात प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असून प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थींसाठी काही सोयी-सुविधा उपलब्ध असतात. विमानाबाबत दोन प्रकारच्या नोकऱ्या असतात. विमान चालवणारी एक आणि विमानाची देखभाल करणारी एक. त्यातल्या विमान चालवणाऱ्यांना पायलट तसंच त्याला सहाय्य करणाऱ्याला को-पायलट म्हणतात. पायलट होण्यासाठी घ्यावं लागणारं प्रशिक्षण अतिशय महागडे असते. .

No comments:

Post a Comment