मुंबई दी
उर्मिला मातोंडकर पुन्हा टीव्हीच्या पडद्यावर झळकणार आहे होय तब्बल एका दशकानंतर पुन्हा एकदा उर्मिलाला आपण छोट्या पडद्यावर दिसणार आहे
उर्मिला २००८ मध्ये टीव्हीच्या पडद्यावर दिसली होती. आता एका वाहिनीवरील गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाद्वारे ती तब्बल दशकभरानंतर टीव्हीच्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. आपल्या हलक्या आणि उडत्या पदन्यासाबद्दल विख्यात असलेल्या उर्मिलाने या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, तो एकाच कारणासाठी : ते म्हणजे हे नृत्य गणपतीसाठी आहे. एरवी टीव्हीपासून दूर राहणाऱ्या या नर्तिकेने केवळ गणपतीसाठी आपल्या निर्णयास अपवाद केला आहे. यात ती काही गाजलेल्या गाण्यांवर नृत्य सादर करणार आहे. तिच्या या गाण्यांमध्ये नामवंत नृत्यदिग्दर्शिका शक्ती मोहन हिच्याबरोबर ती 'पिंगा ग पोरी पिंगा' या गाण्यावर नृत्य करणार आहे.
आपल्या स्टायलिश लूकबद्दल प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री या कार्यक्रमासाठी अनेक गोष्टींवर बारकाईने लक्ष घालत आहे. या कार्यक्रमात ती नऊवारी साडी नेसणार असून, नाकात नथ आणि केसांचा खोपा घालणार आहे. आपल्या नृत्याबद्दल अतिशय उत्सुक बनलेली उर्मिला लवकरच आपल्या नृत्याची तालीम सुरू करणार आहे..

No comments:
Post a Comment