कार उलटून एक जण जागीच ठार

Tuesday, September 11, 2018

कळमनुरी / प्रतिनिधी.
हिंगोली - नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील मोरवाडी नजीक कार पलटी होवून एक जण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.९) रात्री १० वाजेच्या सुमारास घडली..


वाशिमकडून हैद्राबादकडे कार (एम.एच. ३० ए. ९७७७) जात असतांना मोरवाडी नजीक गाडी उलटली. कारमध्ये दीपक नामदेराव आढाव (रा. देऊळगाव ता.पातूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सचिन शेंदरे व प्रमोद मोकळे (रा.मंगरूळपीर ता.जि. वाशिम) हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नगरसेवक राजू संगेकर, अमोल बुद्रुक, नागेश पवार, गजानन निळकंठे, रामले आनेवार हे घटनास्थळी पोहोचले. तसेच सदरील घटनेची माहिती कळमनुरी पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गणपत राहिरे, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पोकॉ. इंगळे, घोगरे यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी व मयतास उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेप्रकरणी दुसऱ्या दिवशी सोमवारी(दि.१०)कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता..

No comments:

Post a Comment