मेट्रो ३ : करारावर अंतिम स्वाक्षऱ्या

Tuesday, September 11, 2018

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सिप्झ या तिसऱ्या संपूर्णत: भुयारी मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक ट्रेन्सच्या करारावर सोमवारी अंतिम स्वाक्षऱ्या करून प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहे. एमएमआरसीएलने अत्याधुनिक रोलिंग स्टॉकच्या खरेदीसाठी ऑलस्टॉम ट्रान्सपोर्ट इंडिया लिमिटेड आणि एलस्टॉम ट्रान्सपोर्ट एस.ए. प्रान्स यासोबत १९ जुलै २०१७ रोजी करारानुसार कार्यादेश देण्यात आला होता. .

एलस्टॉम कंपनीच्या माध्यमातून २४८ अत्याधुनिक मेट्रो डब्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक ८ डबे असलेल्या एकूण ३१ गाड्यांचे अत्याधुनिक डिझाईन, उत्पादन, पुरवठा स्थापित करणे आणि यांची तपासणी आणि कमिशन करणे या कामाचा समावेश आहे. गाडीची रूंदी ३.२ मीटर असून, लांबी १८० मीटर इतकी असणार आहे. २३५० प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतील, अशी व्यवस्था आहे. 

ही ट्रेन २५ केव्ही एसी टॅक्शन सप्लायवर चालवली जाणार असून, स्टेनलेस स्टिलच्या डब्यात ४ दरवाजे असणार आहेत. मेट्रो डब्यांबाबतचा हा करार प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असून सुरक्षित, सुखकर व आरामदायी प्रवासाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल असल्याचे मत एमएमआरसीएलच्या प्रवक्त्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे. ऑलस्टॉम इंडिया आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक अलिन स्पॉहर यांनी मेट्रो ३ चे भागीदार असल्याचा आनंद व्यक्त करून मुंबईकरांच्या वाहतूक समस्या सोडवण्यास प्रयत्नशील राहू, असा विश्वास व्यक्त केला आहे..

No comments:

Post a Comment