दुबई : संयुक्त अरब अमिरातीमध्ये रंगणाऱ्या आशिया कपमधील सर्वसामन्यांना आयसीसीने अधिकृत दर्जा बहाल केला आहे. आशिया कपमध्ये बलाढ्य भारतासहित पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांच्यात खरी चुरस असेल
. मात्र, अफगाणिस्तान, नेपाळ आणि हाँगकाँग संघही या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यजमान संयुक्त अरब अमिरातीला पराभूत करून हाँगकाँग आशिया कपच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरला. हाँगकाँगला एकदिवसीय संघाचा दर्जा अद्यापि प्राप्त झाला नाही. झिम्बाब्वेत रंगलेल्या विश्वचषकाच्या पात्रता सामन्यांना अधिकृत दर्जा देण्यात आला नव्हता. त्यामुळे आयसीसीच्या कार्यपद्धतीवर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठवण्यात आली होती. झिम्बाब्वेसारखी घोडचूक पुन्हा होऊ नये, म्हणून आयसीसीने आशिया कपमधील सर्व एकदिवसीय सामन्यांना अधिकृत दर्जा दिला..

No comments:
Post a Comment