हिंगोली / प्रतिनिधी
यंदा सोयाबीन पिकावर खोंड अळी लागल्याने सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेंगा चपट्या होऊन काळ्या पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईबाबत पिक विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार करावी असे आवाहन भाजपा नेते रामरतन शिंदे यांनी केले आहे.
शेंगा परिपक्व होण्याच्या काळात सोयाबीनवर बुरशीजन्य आजाराने हल्ला केल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार करावी यासाठी ग्रामपंचायतीने तसा अधिकृत ठराव घेवून याची प्रत जिल्हाधिकारी, पालकमंत्री, आमदार, खासदार, कृषि अधिकारी व संबंधित तहसीलदारांकडे पाठवावी यामुळे शेतकऱ्यांची नुकसान ग्रस्त परिस्थिती लक्षात येईल. व शेतकऱ्यांना पिक विमा लागू होईल यासाठी सर्व शेतकऱ्यांनी जागृत राहून ही कार्यवाही करावी, असे आवाहन भाजपा नेते रामरतन शिंदे यांनी शेतकऱ्यांंना केेले आह

No comments:
Post a Comment