घरकूल लाभार्थ्यांनी दलालांच्या भुलथापांना बळी पडू नये-आ.मुटकुळे

Thursday, September 20, 2018

हिंगोली / प्रतिनिधी 
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांना घरकूल मंजूर केली जात आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या निवड याद्या केंद्र शासनाकडून तयार होवून येत आहेत. लाभार्थ्यांची निवड शासनाकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर केली जात असल्यामुळे त्यामध्ये कुणालाही हस्तक्षेत्र करता येत नाही. 

परंतू, काही दलाल मंडळी लाभार्थ्यांना घरकूले मंजूर करून देण्याबाबत अमिष दाखवू त्यांच्याकडे पैशाची मागणी करीत असल्याबाबत तक्रारी येत आहेत. वास्तविक पात्र लाभार्थ्यांचे घरकुलांचे मंजुरीसाठी एक रूपयाही खर्च येणार नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने दलालांच्या भुलथापांना मुळीच बळी पडू नये, असे आवाहन आ.तान्हाजीराव मुटकुळे यांनी केले आहे.

 सदर योजनेअंतर्गत घरकुल मंजूरीसाठी कुणी पैशाची मागणी करीत असल्यास जिल्हाधिकारी हिंगोली किंवा आ.तान्हाजीराव मुटकुळे यांच्या संपर्क कार्यालयात संपर्क करावा व तक्रार करावी असे आवाहनही आ.तान्हाजीराव मुटकुळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment