मोदी सरकार हाय हाय... इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक

Thursday, September 20, 2018

हिंगोली / प्रतिनिधी 
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल, गॅस, इंधन दरवाढ व महागाईच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने 19 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला होता. मोदी सरकार हाय हाय... अशी घोषणाबाजी करत गाढवाच्या गळ्यात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांचे फोटो अडकवून इंधन दरवाढीचा निषेध केला. 

मोदी सरकारच्या काळात सर्व सामान्यांना जीवन जगणे अवघड झाले आहे. भाजप सरकार सत्तेत येण्यापुर्वी अच्छे दिनचे आश्वासन दिले होेते. पण वास्तवात मात्र काहीच नाही. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, तरूणांच्या हाताला काम नाही, पेट्रोल शंभरीकडे वाटचाल करीत आहे, गॅस सिलेंडरच्या किंमती हजाराकडे धावत आहेत. त्यामुळे सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. सरकारने केलेल्या आश्वासनांची पुर्ती अद्यापर्यंत झालेली नाही त्यामुळे या इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने 19 सप्टेंबर रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. संतप्त शिवसैनिकांनी मोदी सरकार हाय हाय.. निवडणुकीनंतर भाजपा बाय बाय.. अशा घोषणा दिल्या. 

तसेच शासनाचा निषेध करणारे विविध फलके शिवसैनिकांनी हातात घेतले होते. येथील गांधी चौकात गाढवांच्या गळ्यात भाजपाचे रूमाल टाकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लटकवून हे सरकार गाढवासारखे काम करीत आहे, असाही आरोप या आंदोलनातून केला. हे आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, युवा सेना जिल्हाप्रमुख दिलीप घुगे, युवा नेते रामकदम, भानुदास जाधव, भैय्या पाटील गोरेगावकर, उपजिल्हा प्रमुख डी. के. दुर्गे, परमेश्वर मांडगे, जि. डी. मुळे, जि.प.सदस्य फकिरा मुंडे, जि.प.सदस्य बाळासाहेब मगर, पंचायत समिती उपसभापती गोपु पाटील, तालुका प्रमुख सखाराम उबाळे, कडुजी भवर, शहर प्रमुख अशोक नाईक, आनंदराव जगताप, गोपाल अग्रवाल, बांधकाम सभापती श्रीराम बांगर, संदीप मुदिराज, भरत पहेलवान, कानबाराव गरड, नाना वडकुते, शंकर यादव, रमेश राठोड, किरण सोळंके, नंदू खिल्लारे, गजानन खंदारे, साहेबराव देशमुख, शिवराज पाटील, बबलू पत्की, आर.आर.पाटील यांच्यासह शेकडो शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment