औंढा नागनाथ / प्रतिनिधी
शहरातील श्री साई सेवा मंडळातर्फे औंढा ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. 19 सप्टेंबर रोजी हे भाविक शिर्डीकडे रवाना झाले. या पदयात्रेमध्ये सुमारे दिडशे साईभक्तांचा समावेश आहे. यावेळी शिर्डीकडे रवाना होणाऱ्या भाविकांचा सत्कार करण्यात आला.
औंढा नागनाथ येथील श्री साई सेवा मंडळ यांच्यावतीने दरवर्षी औंढा ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात येत असते. त्या अनुषंगाने 19 सप्टेंबर रोजी औंढा ते शिर्डी पदयात्रा काढण्यात आली असून या पदयात्रेमध्ये सुमारे दिडशे भाविकांचा समावेश आहे. यावर्षी या पदयात्रेचे बारावे वर्ष आहे. या पदयात्रेचे 15 मुक्काम होणार आहेत. तसेच या साईभक्तांना जागोजागी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. औंढा ते शिर्डी पदयात्रेचे यावर्षीचे बारावे वर्ष आहे. तसेच या शिर्डी पायदळीच्या प्रवासामध्ये सर्व साईभक्तांना उमाकांत शंकरवार, सुधीर गोबाडे, रामनिवास राठी, गणेश देशमुख, विठ्ठल ठाकूर, करण पवार, सुरेंद्र डफळ हे सहकार्य करीत असतात. औढा ते शिर्डी पदयात्रेतील साईभक्तांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी उपसभापती अनिल देशमुख, सुरजितसिंग ठाकूर, कृष्णा ऋषी, राहुल दंतवार, ममलेश देशमुख, बाळू ठाकूर, प्रशांत गंभीरे, गजानन पाटील, रामा खुळखुळे, उत्तमराव देशमुख, लक्ष्मण पवार, श्रीनिवास राठी, संजय अग्रवाल, दताञय शेगुकर, लक्ष्मणराव लोखंडे, आत्माराम लाड, प्रमोद देव, प्रल्हाद पोपळघट, गंगाधर जावळे, मनोज देशमुख आदंींची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment