नादुरूस्त ट्रान्सफार्मर तात्काळ बदलुन द्या आ. मुटकुळेंच्या अधिकाऱ्यांना सुचना

Friday, September 14, 2018

हिंगोली / प्रतिनिधी 
सध्या शेतातील पिकांना पाणी देण्याचा हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे विज वितरण प्रणालीवरील भार वाढून ट्रान्सफार्मर नादुरूस्तीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नादुरूस्त बदलण्यास बराच कालावधी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभुमीवर 13 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मंडळ कार्यालयात बैठक घेऊन नादुरूस्त ट्रान्सफार्मर तात्काळ बदलुन देण्यात यावे अशा सुचना यावेळा अधिकाऱ्यांना दिल्या. 

या बैठकीत 33 केव्ही सबस्टेशनचे ट्रान्सफार्मरची क्षमता वाढविणे, नविन झालेल्या कोळसा 132 केव्ही उपकेंद्रामधून नविन फिडर काढण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार सदर कामांचा प्रस्ताव दोन दिवसाच्या आत वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेली विज बिलाची थकबाकी भरून विद्युत वितरण कंपनीस सहकार्य करावे तसेच नादुरूस्त ट्रान्सफार्मरची वाहतुक खाजगी वाहनाने न करता कंपनीच्या वाहनानेच करावी असे आवाहन यावेळी आ. तान्हाजीराव मुटकुळे व अधिक्षक अभियंता जाधव यांनी केले. याप्रसंगी प्रशांत सोनी, फुलाजी शिंदे, मोतीराम इंगोले, गजानन काळे व विद्युत वितरण कंपनीचे औरादे, रामगीरवार, राठोड, वडगावकर, बेलसरे अधिकार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment