हिंगोली / प्रतिनिधी
कळमनुरी मतदार संघाचे माजी आ.गजाननराव घुगे यांच्या 13 सप्टेंबर रोजी वाढदिवसानिमीत्त जिल्हाभरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.औंढा नागनाथ येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. दैनिक मराठवाडा नेताच्या वतीने जिल्हाप्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंेढे यांनी विठ्ठलाची प्रतिमा देवुन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कळमनुरी येथे आयोजित कार्यक्रम पार पडला. तसेच 14 सप्टेंबर रोजी वाढदिवसानिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
औंढा नागनाथ येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर आळंदीचे अध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य मा.आ. गजानरावजी घुगे यांचा वाढदिवसानिमीत्त त्यांनी श्री नागनाथ प्रभुस दुग्ध अभिषेक केला. यावेळी देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुरजितसिंग ठाकूर, राम नागरे, उद्धव नागरे, गणेश पाटील, सुनिल देशमुख, गणेश देशमुख, बबन सोनुने, संजय लोंढे, श्रीपाद दिक्षीत, राजू गिरी, डॉ. दिलीप सांगळे, पांडुरंग पाटील, नारायण सोळंके, सखाराम इंगळे, तात्या इंगळे, सर्जेराव दिंडे आदींची उपस्थिती होती. तसेच आ.गजानन घुगे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरासह कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम घेण्यात आले.
वाढदिवसानिमित्त कळमनुरीत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यास आ.तान्हाजी मुटकुळे, आ.निलय नाईक, माजी खा.शिवाजी माने, बाबाराव बांगर, सुरजितसिंह ठाकूर, तालुकाध्यक्ष संजय कावडे, मिलींद यंबल, रामराव पतंगे, के.के.शिंदे, दिनकर कोकरे, पी.आर.देशमुख आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात माजी आ.गजानन घुगे यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी घुगे यांनी सर्वांचे आभार मानत ही ताकद भक्कमपणे पक्षासाठी वापरत पुढील विधानसभा व लोकसभेमध्ये भाजपाचाच विजय होईल यासाठी कार्यकर्त्यांनी कामास लागावे असे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अण्णा मेने, अशोक संगेकर, अमिष दरक, गोविंद मणीयार, उमेश सोमाणी, विद्याधर मगर, विठ्ठल गाभणे, विक्रम शिंदे, गोविंद गाभणे, योगेश संगेकर, विलास भोसकर, सुरेश नायकोल, एहसान सिद्दीकी, रूपेश सोनी, श्रीकांत मांडवगडे, बाळू घुसे, लक्ष्मण कऱ्हाळे आदींसह भाजप कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गजानन कुटे यांनी केले तर आभार संजय घुगे यांनी मानले.


No comments:
Post a Comment