भारत-पाक सामना १९ सप्टेंबरला

Friday, September 14, 2018

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरात येथे १५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाक यांच्यातील हाय व्होल्टेज सामना १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध गेल्या तीन वर्षांत अवघे तीन सामने खेळले आहेत. मात्र, या महिन्यात याच संघाविरुद्ध भारताची तीन वेळा गाठ पडण्याची शक्यता आहे. .

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापयंर्त एकूण १२९ वन-डे सामने झाले आहेत. यामध्ये भारताने ५२ सामने जिंकले असून, संघाचा सक्सेस रेट ४१.६० टक्के इतका आहे. तर पाकने एकूण ७३ सामने जिंकले असून, चार सामन्यांचा निकाल लागलेला नाही. आशिया चषक स्पर्धेच्या निमित्ताने भारताला या आकडेवारीतील फरक कमी करण्याचीच संधी मिळणार आहे. आशिया चषक स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. या संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाक तसेच एक क्वॉलिफायर संघ म्हणजे हाँगकाँग 'अ' गटात आहे. तर 'ब' गटात श्रीलंका, बांगलादेश व अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. १४ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने दुबई अथवा अबुधाबीमध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू होणार आहेत. आशिया चषकचा फॉरमॅट थोडा वेगळा आहे. स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी असून, त्याची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे.

भारत आणि पाक यांच्यात १९ रोजीच्या सामन्यानंतर या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघात पुन्हा २३ सप्टेंबर रोजी गाठ पडण्याची शक्यता आहे. 'अ' गटात भारत, पाक व हाँगकाँग यांचा समावेश आहे. जर खळबळजनक निकालाची नोंद झाली नाही तर या गटात भारत व पाक अव्वल ठरू शकतात. असे जर झाले तर हे दोन्ही संघ २३ सप्टेंबर रोजी एकमेकांविरुद्ध भिडतील. या दोन्ही संघांनी फायनलमध्ये प्रवेश केल्यास त्यांच्यात आणखी एक सामना होण्याची शक्यता आहे..



No comments:

Post a Comment