केरळ पूरग्रस्तांसाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने केला ११ लाख रुपयाचा निधी राज्य सरकार कडे सुपूर्द

Tuesday, September 11, 2018

लातूर, दि,११,
केरळ राज्यातील पूरग्रस्तांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्व संचालक ,कर्मचारी , बँक गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांसाठी आकरा लाख रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहा्यता निधीस लातूर चे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्याकडे आज मंगळवारी देण्यात आला. 

राज्य शासना च्या आदेशान्वये ही मदत राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्यात आला
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाठ ज्येष्ठ संचालक एस आर देशमुख, यशवंत पाटील, संचालक संभाजी सुळ, एन आर पाटील, अँड प्रमोद जाधव,सौ स्वयं प्रभा पाटील, सौ शिवकन्या पिंपळे बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव, जिल्हा उप निंबधक समृत जाधव यांच्या उपस्थितीत देण्यात आले 

याप्रसंगी बँकेचे व्यवस्थापक तानाजी जाधव, बि वी पवार, सुनील पाटील, हरिराम कुलकर्णी, भास्कर सोनवणे उपस्थित होते

No comments:

Post a Comment