नांदेड : दिवसेंदिवस वाढत असलेल्या कुपोषण आजाराच्या प्रमाणाची दक्षता घेऊन केंद्र शासनाने राबवित असलेल्या कुपोषणमुक्त अभियानाची बिलोली तालुक्यात मंगळवार दि ११ सप्टेंबर रोजी मिनलताई खतगावकर यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरूवात केली. यावेळी उपस्थित शालेय विद्यार्थीनींना कुपोषण होण्या मागची कारणे सांगत मातृत्वाच्या आहारावार नवजात बालकांचे भविष्य अवलंबून असल्याचे प्रतिपादन डाँ.मिनलताई खतगावकर यांनी यावेळी केले.'
देशात दरवर्षी कुपोषण आजाराने होणाऱ्या बालकांच्या मृत्युचे प्रमाण, देशातील कुपोषणाची संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने महिला व बालविकास विभागामार्फत राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात कुपोषण मुक्त अभियान राबविले जात आहे. त्यानुषंगाने मंगळवार दि ११ सप्टेंबर रोजी बिलोली येथे एकात्मिक बालविकास कार्यालयाच्या वतिने या अभियानाची सुरूवात करण्यात आली.
या कार्यक्रमास बिलोली शाहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, आंतरभारती विद्यालय व उर्दु हायस्कुल बिलोली आदी प्रशालेतील किशोरवयीन विद्यार्थीनींना जि प सदस्या मिनलताई खतगावकर यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी ? कुपोषण होण्याची कारणे काय ? कुपोषण टाळण्यासाठी कोणती दक्षता घ्यावी? कमी वजनाची बालके जन्मन्याची कारणे, अशा विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले. या कुपोषण मुक्त अभियानाचे प्रास्ताविक एकात्मिक बालविकास अधिकारी गिरगावाकर मँडम, सुत्रसंचलन नरंगले सर तर आभार पर्यवेक्षिका नाईक मँडम यांनी केले.

No comments:
Post a Comment