अच्छे दिन शेतकऱ्यांना नव्हे तर सत्ताधारी नेत्याला आले : माजी मंत्री दिलीपराव देशमुख

Tuesday, September 11, 2018

राणी अंकुलगा .दि.11
देशातील आणि राज्यातील सरकारांनी शेतकऱ्याना चांगले दिवस आणतो म्हणून लोकांना भुरळ घातली मात्र निवडून आल्यानंतर गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांना कुठलीही मदत दिली नाही मात्र सत्तेत असलेल्या लोकांना मात्र त्यांनी दिलासा कर्जमाफी दिली असून या थापा मारणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखवून द्या आणि सर्वसामान्य माणसाला, शेतकरी, सर्वधर्म समभाव सर्वांना मदत करणाऱ्य काँग्रेस च्या विचाराशी आपण खंबीरपणे उभे रहा असे सांगून मांजरा परिवार शेतकऱ्यांच्या पदरात या वर्षी पेक्षा अधिक भाव पुढच्या वर्षी देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली . यावेळी ग्रामस्थातर्फे मान्य वरांचा सत्कार करण्यात आला .व जि.म.बँकेची शाखा राणि अंकुलग्याला दयावी यासाठी निवेदन देण्यात आले .

यावेळी दिलीपराव साहेबांनी बँकेची शाखा देण्याचे आश्वासन शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी आकुलगा.. येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ऋण निर्देश सोहळ्यात त्यांनी दिली .पुढे बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की देशात राज्यात ठिकठिकाणी गेल्या चार वर्षांपासून सत्तेवर आलेल्या सरकारनी सर्वच आणीबाणी लागू केल्यासारखी परिस्थिती निर्माण केली असून शेतकरी, व्यापारी, शासकीय अधिकारी कर्मचारी, सर्वच क्षेत्रात मंदी आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे यासाठी आपण चांगले दीवस आणतो म्हणून तुमची फसवणूक केली त्यासाठी आता आपण विचार करा आणि जून ते सोन या म्हणीप्रमाणे सर्वांना मदत करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या विचाराला साथ द्या निश्चितपणे सत्ताबदल होणार आहे असे ते यावेळी म्हणाले . 

यावेळी माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर,आमदार अँड त्रिंबकजी भिसे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अॅड . विश्वंभर रावजी माने साहेब जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाठ, रेणा साखर कारखान्याने चेअरमन आबासाहेब पाटील, मांजरा साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन श्रीशैल्य उटगे, संचालक संभाजी रेड्डी, संचालक संभाजी सुळ , जागृतीचे व्हा . चेअरमन लक्ष्मणरावजी मोरे , विजयकुमार पाटील, प्रभाकराव बंडगरआदी उपस्थित होते . सुत्रसंचालन डॉ . ओमप्रकाश जाधव यांनी केले . तर आभार प्रदर्शन लक्ष्मण राव जागले यांनी केले .

या दौऱ्यात ऊस उत्पादक शेतकरी यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांचे स्वागत केले तर यावेळी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली .यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर यांचेही भाषण झाले . त्यांनी ही या सरकारवर सडकून टिका केली .या दौऱ्यात काँग्रेस पदाधिकारी , कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .नंतर सरपंच विकास लक्ष्मणराव जागले यांच्या घरी दिलीपराव देशमूख साहेबांनी सदिच्छा भेट दिली . यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .

No comments:

Post a Comment