जीप- ट्रक अपघातात सहा ठार.

Friday, September 21, 2018

हिंगोली शहराजवळील घटना, मृत वाशिम जिल्ह्यातील.

हिंगोली / प्रतिनिधी
हिंगोली-वाशिम रोड वर हिंगोली शहारा जवळच असेलेल्या अन्नपूर्णा शाळे नजीक आज २१ सप्टेंबर शुक्रवारी रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक ट्रक व महेंद्रा कंपनीच्या जीप मध्ये समोरासमोर समोर भीषण अपघात झाला या दुर्देवी घटनेत सहा जण जागीच ठार झाले आहेत तर दोघे जखमी अवस्थेत आहेत. मयत वाशिम जिल्ह्यातील आडगाव येथील रहिवासी आहेत.

    वाशिम कडून महेंद्रा कंपनीची जीपक्रमांक एमयच ३७ व्ही २४४४ ही हिंगोली कडे येत होती तर हिंगोली वरून वाशिम कडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक यचआर ६९ अ ६८८५ मध्ये रात्री दोन वाजण्याच्या सुमारास समोरासमोर धडक झाली या भीषण अपघात जीप मधील सहा जण जागीच  ठार झाले तर दोघे जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भयानक होता की, जीपचा समोरील भाग या अपघातात चकाचूर झाला आहे. तर ट्रकचे समोरील चाक तुटून पडले आहे. 

अपघात कारचा संपूर्ण चुराडा झाल्याने जीप मध्ये अलेल्या व्यक्तींना बाहेर काढणे अवघड झाले होते. मात्र हिंगोली ग्रामीण पोलिसांनी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन धारकाच्या मदतीने जीपचे दरवाजे तोडून जखमी व मृत व्यक्तींना बाहेर काढले सदरील घटनेत जीप मधील पाच जण जागीच ठार झाले असून दोघे जखमी आहेत. जखमींवर हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू करून पुढील उपचार साठी नांदेड येथे पाठवले आहे. दरम्यान या घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला आहे.

No comments:

Post a Comment