अभिनेता गोविंदा आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन या जोडगोळीने ९० च्या दशकामध्ये बॉलीवूडमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला. या जोडीचे एका पाठोपाठ एक असे तब्बल पंधरा चित्रपट हिट गेले. १९८९ मध्ये डेव्हिड धवनने आपल्या कारकीर्दीची सुरुवात 'ताकतवर' या चित्रपटापासून केली.
गोविंदा यात नायक होता. पुढे या जोडीने 'शोला और शबनम', 'साजन चले ससुराल', 'हीरो नंबर वन', 'कुली नंबर वन', 'दल्हे राजा' आणि 'बडे मियाँ छोटे मियाँ' यांसारखे ब्लॉकब्लस्टर चित्रपट दिले. 'पार्टनर' हा या जोडीने दिलेला शेवटचा चित्रपट. २००७ साली आलेल्या या चित्रपटानंतर मात्र या दोघांमध्ये काहीतरी बिनसले. त्याबद्दल बोलताना गोविंदा म्हणाला की 'डेव्हिडने 'चश्मे बद्दूर' चित्रपट बनवला. त्याची कथा खरे तर मीच त्याला ऐकवली होती. मात्र प्रत्यक्षात त्याने तो चित्रपट दुसऱ्याच अभिनेत्याला घेऊन बनवला. त्यामुळे मला फार दु:ख झाले. त्याच्याबरोबर केलेले चित्रपट आणि त्यात मिळालेले यश मी कधीही नाकारू शकत नाही, परंतु त्याच्या वागण्याचा माझ्या मनाला फार त्रास झाला. त्यामुळे मी स्वत:हून त्याच्याशी चित्रपटाबद्दल बोलणार नाही. त्याने स्वत:हून ऑफर दिली तर विचार करेन. बऱ्याच कालावधीनंतर गोविंदा पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये परतला आहे. .

No comments:
Post a Comment