लातूर,दि.२० - सर्वांचा लाडका गणरायाला निरोप देताना पुजेचे साहित्य यामध्ये हार, ङ्गुले, नारळ या वस्तु पाण्यात न टाकता घंटा गाडीतच टाकावे आणि प्रदुषणमुक्त, स्वच्छ आणि सुंदर लातूरची ओळख कायम ठेवावी असे आवाहन निर्माल्य ग्रुपच्यावतीने लातूरकर गणेश भक्तांना करण्यात आले आहे.
सण - उत्सावादरम्यान भक्तांनी पुजेचे साहित्य, प्लॉस्टीक पाण्यात टाकू नये यामुळे प्रदुषण वाढून पर्यावरणाला बाधा पोहचू शकतो यावर उपाय म्हणून महानगर पालिका प्रशासनाच्यावतीने स्वच्छता वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोबतच स्वच्छता मोहिमेत आपला सहभाग राहावा यासाठी प्रती वर्षाप्रमाणे यावर्षीही निर्माल्य ग्रुपच्यावतीने स्वच्छ आणि संदुर लातूरसाठी तयारी करण्यात आली आहे. गणेश उत्सव काळात ग्रुपच्यावतीने निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वतंत्र वाहन, सोबत स्वयंसेवक आणि पर्यावरण संतुलनासाठी आवाहन करीत निर्माल्य ग्रुप काम करीत आहे. गणेश विसर्जनापर्यंत हे कार्य सुरू राहणार असून शहरातील गणेश मंडळ, लातूरकर नागरिक यांनी शहर महानगरपालिका आणि निर्माल्य ग्रुपच्या या उपक्रमास सहकार्य करून लातूरच्या सौदर्यांस हातभार लावावा असे आवाहन ग्रुपच्या मोनिका राठी, रचना मालपाणी, शितल बियाणी, दिपाली रांदड, निर्मला खटोड, नितीन भराडीया, पुरणमल मंत्री, आशिष बाहेती, आनिता मालू, विनीता बंग आदिंनी केले आहे.

No comments:
Post a Comment