रेणापूर / प्रतिनिधी
आ. विनायकराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, पक्षात गटबाजी वाढविणारे विरोधी पक्षाचे हस्तक आहेत. त्यांचा तुम्ही विचार करू नका एवढी जनता तुमच्या पाठीशी आहे.
तुम्ही काम करा, तुमच्या सोबत ना. संभाजीराव पाटील निलंगेकर आहेत. पंकजाताई आहेत. मुख्यमंत्री आहेत, असे सांगून माजी मंत्री आ. विनायकराव पाटील म्हणाले रेणापूर हा भाजपचा गड आहे. गोपीनाथरावजी मुंडे यांनी रेणापूरच्या जनतेला मतदार माझी आई म्हणायचे. मी पालकमंत्र्यांना विनंती करतो संभाजीराव, अरविंदराव तुम्ही लातुर ग्रामीणकडे जास्त लक्ष द्या. व छोटू भैया यांनी जिल्हा व्यवस्थित हाताळला म्हणूनच जिल्हा परिषद, महानगरपालिका येथे भाजपची सता आली. भाजपकडे सगळ्यांचे बायोडाटे असतात ते वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षात विरोधी कार्यवाह्या करणाऱ्याकडे लक्ष ठेवतात म्हणून रमेश आप्पा तुम्ही जास्तीत जास्त कठोर परिश्रम करा जनता तुमच्या सोबत आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत असंही आ. विनायकराव पाटील म्हणाले.
- क्षणचित्रे
- पाहुण्यांचे आगमन होताच जोरदार आतषबाजीने स्वागत करण्यात आले
- आजच्या सभेत सर्वच पाहुण्याचे भाषणात अरविंद पाटील निलंगेकर यांचा खास गौरवपुर्ण उल्लेख करण्यात आला
- गोविंद आण्णा केंद्रे यांनी भाजप हा पक्ष कार्यकर्त्यांसाठी कसा योग्य आहे हे सांगितले.
- भाषणं चालू असताना रमेश कराड आगे बढो हम तुम्हारे साथ है, संभाजीराव पाटील तुम आगे बढा हम तुम्हारे साथ है भारतीय जनता पार्टीचा विजय असो
- बुथ कार्यकर्ते व प्रमुख कार्यक र्त्यांचा अभुतपुर्व मेळावा व प्रचंड गर्दी होती.
- जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान ही एक महत्वपुर्ण घटना रेणापूर येथे घडली.
- सर्वच कार्यकर्ते रमेश कराड यांच्याकडे अत्यंत भावनिक दृष्टीकोनातून बघताना दिसत होती. तर रमेश कराड यांनी ही जनता म्हणजे माझी आहे असाही उल्लेख केला.
- संचलन चंद्रकांत कातळे यांनी केेे ले.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment