रेणापूर / प्रतिनिधी
यावेळा भाजप प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे म्हणाले की, भाजप हा पक्ष कर्तृत्ववान लोकांना साथ देणारी आहे. जुना नवा वाद नाही आणि रमेश आप्पा मन मोठ करा तुम्ही नक्की आमदार होणार आणि यावेळा राजकारणात येणाऱ्या विविध अडचणी सांगत असताना आपण आत्मविश्वासाने निर्भयपणे लोकांत जायला पाहिजे. अडचणी असता त्या सांगायच्या नसतात
. ज्या देशात इंदिरा गांधींचा मतदारांनी पराभव केला इथ देशमुख फार चिल्लर आहेत. त्यामुळे तुम्ही काम करा लोक तुमच्या सोबत आहेत, असं सांगून गोविंद आण्णा केद्रे म्हणाले, प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आमच सेम असतं. हे सांगत त्यांनी भारतीय जनता पक्षात कधी कधी कोणाला संधी मिळते याचा सविस्तर ओहा पोह केला. आमदारकीला तिकीट नाकारलेल्या माणसाला रात्री बारा वाजता फोन येतो आणि राज्यसभेची उमेदवारी मिळते त्यामुळे बुथ कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवावे अगली बारी नही अबकी बार अशा भुमिकेतून रेणापूर मतदार संघात भाजपचं कमळ फुलवावे असं सांगितले.
गोविंद केंद्रे म्हणाले की, रमेश आप्पा काळजी करू नका कॉंग्रेसमध्ये लय फाटाफुट आहे. आमदाराच्या समोर दुसऱ्याला भावी आमदार म्हटलं जातं यावरून लक्षात घ्या आपल्याला रेणापूरकरांना अच्छे दिन आहेत. यावेळा जिल्हाध्यक्ष नागनाथ अण्णा निडवदे यांनी समयोचित विचार मांडले.
कॉंग्रेसने गरीब आणि श्रीमंतात दरी वाढविली- आ. भालेराव
कॉंग्रेस पक्षाने गरीब आणि श्रीमंतात दरी वाढविण्याचे काम केले. आप्पा या पापी लोकांपासून सावध रहा हे भस्मासूर आहेत. त्यांना बेचैन होत आहे. कारण त्यांच्या दुकानदाऱ्या बंद झाल्या. भारतीय जनता पार्टी लोकांना थेट मदत करत आहे. पुर्वी गरीबांना एक म्हैस मंजूर व्हायची अधी म्हैस मंजूर करणाऱ्यांना आणि अर्धी म्हैस शेतकऱ्यांना द्यायचे. भाजपात श्रद्धा आणि सबुरी ठेवा श्रद्धा म्हणजे विश्वास आणि सबुरी म्हणजे थोडी वेळ द्या मग भाजपात सबका साथ सबका विकास होतो. पुढे आपल्या विनोदी स्टाईलमध्ये विरोधी पक्ष काँग्रेस कसा भस्मासुर आहे, कसे नाटक करतात, कसे थयथयाट करतात याच्या काही गोष्टी सांगितल्या.
विकासाचा वेग वाढला- खा.सुनिल गायकवाड
लातूरला पासपोर्ट केंद्र, निट केंद्र मंजूर झाले. 170 कोटी रूपयांचे केंद्राचे हॉस्पीटल बांधून पुर्ण झालेले आहे. अगोदर दोन रेल्वे येत होत्या आता वीस रेल्वे येत आहेत. 9 हजार कोटीचे नॅशनल हायवेचे काम सुरू आहे. वेगवेगळ्या आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. दुष्काळमुक्त लातूर करण्याचा प्रयत्न पालकमंत्री करत आहेत, असं सांगून विविध विकास कामांची माहिती दिली. व ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा देण्याचे काम मोदी सरकारने केले असंही खा. सुनिल गायकवाड म्हणाले.
प्रास्ताविक पंचायत सभापती भिसे यांनी केले. यावेळा अभिषेक आकनगिरे यांनी रेणापूरकडे पालकमंत्र्यांचे लक्ष असल्यामुळे आभार मानले. वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाचा दुरूपयोग करणाऱ्या मंडळींपासून लोकांनी सावध रहावं असेही यावेळी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे म्हणाले. यावेळा समयोचित भाषणे जि.प.उपाध्यक्ष राम तिरूके यांनी केले. तसेच आपल्या अभ्यासपुर्ण भाषणात सौ. संगीता घुले यांनी रेणापूरकडे अधिक विकास निधी द्यावा अशी मागणी केली.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment