रेणापूरातून लोकसभेचे रणशिंग फुंकले खासदार सह जिल्ह्यात ६ आमदार निवडून आणणार : पालकमंत्री

Monday, September 3, 2018

  • रेणापूर येथील कार्यकर्ता मेळावा प्रसंगी ना संभाजीराव पाटील यांचे उदगार 
  • कॉंग्रेसने खालच्या दर्जाचे राजकारण केले त्यांना जनता माफ  करणार नाही 


रेणापूर / प्रतिनिधी 
कॉंग्रेसने देशाचे, गोरगरीबांना अडवण्याचे राजकारण केलं, आम्ही गप्प बसतोत याचा अर्थ वेगळा घेऊ नये, ज्यांनी ऊसाच्या आडून लातूर जिल्ह्यात दुष्काळ आणला. एकही मोठा प्रकल्प आणला नाही त्यांना जनता क्षमा करणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देशात आणि राज्यात विकासाची गरूडझेप घेतली जात आहे. सतर वर्षात कॉंग्रेसने जेवढी मदत केली त्यापेक्षा जास्त मदत चार वर्षात मोदी सरकार व फडणवीस सरकारने केली. कुटूंबाच्या हितासाठी कारखाने काढणाऱ्यांनी एकही मोठा प्रकल्प आणला नाही, असे सांगून येणाऱ्या काळात लोकसभेची एक जागा व विधानसभेेच्या सहा जागा भाजपच्याच येणार असा ठाम विश्वास रेणापूर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निर्धार लोकसभा निवडणुकीचा, संकल्प 3 लाख मताधिक्याचा या मेळाव्यात बोलताना केले. 

अध्यक्षस्थानी रमेश आप्पा कराड होते. खा सुनील गायकवाड, आ. विनायकराव पाटील, आ. सुधाकर भालेराव, युवा नेते अरविंद भैय्या निलंगेकर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, भाजप जिल्हाध्यक्ष निडवदे, जि.प.अध्यक्ष मिलींद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके, बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, समाजकल्याण सभापती दोरवे, महिला बालकल्याण सभापती सौ संगीता  बाबासाहेब घुले हे होते. रेणापूरचे नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, जि.प.सदस्य प्रशांत पाटील, राजेंद्र माने, शामसुंदर वाघमारे, भाजपा तालुका अध्यक्ष ऍड. दशरथ सरवदे, जि.प.सदस्य सुरेश लहाने, रमेश सोनवणे, सुरेश लहाने, संगीता घुले, कलबुर्गे, महापौर सुरेश पवार हे होते. ना. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा हा महाराष्ट्रातला पहिला बुथ मेळावा आहे. 

लोकसभेचे रणशिंग रेणापूरहुनच  का 
ना. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, लोकसभा प्रचाराचे रणशिंग रेणापूरहूनच का तर अनाथाचे नाथ गोपीनाथरावजी मुंडे  यांनी राज्यात आणि देशात भाजपाची सता आणली. हजारो हजार कार्यकर्ते निर्माण केले म्हणून व रेणापूर व लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराचा शुभारंभ रेणापूर विधानसभा मतदार संघातून केला आणि भाजपाची सत्ता आली. म्हणून येथून प्रचाराचा शुभारंभ करत असल्याचे ना. निलंगेकर यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षात 1 हजार 87 कोटींचा पिक विमा आला. 1 लाख 75 हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. आणि पारदर्शक कामामुळे हे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेे जमा झाले. कुणाचीही कपात झाली नाही. 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचं पंतप्रधानांच स्वप्न आहे, असंही ते म्हणाले. कबाले 2018 अखेरपर्यंत सर्वांच्या नावाने दिले जातील, अशी ग्वाही रमेश आप्पा कराड यांना दिली. 

कारखान्याच्या आडून जिल्ह्यात दुष्काळ आला. कोणत्या विकासाच्या योजना आणल्या हे सांगा, आज नॅशनल हायवे अंतर्गत रस्ते, कॅन्सरमुक्त अभियान, राबविले जाणार आहे. लाखो रूपये खर्चुन महात्मा ज्योतीबा फुले योजना अंतर्गत आरोग्यासाठी सुविधा मिळणार आहेत. ज्यांच्याकडे सातबारा आहे त्यांना ही योजना लागू आहे, असंही यावेळा ना. निलंगेकर म्हणाले. 

अप्पा झाकली मुठ ठेवा 
पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी रमेश कराड यांना सल्ला दिला की, आपणास मुख्यमंत्री फडणवीस, ना. पंकजा मुंडे काय म्हणाल्या हे झाकली मुठ ठेवा. आणि वाघाचं कातड पांगरून मी वाघ आहे, असं म्हणणाऱ्या लोकांना आपण जनतेच्या साक्षीवर धडा शिकवू असंही निलंगेकर म्हणाले. आमचा उद्देश देशाचे हित, पक्षाचे हित आहे. 

रेणुका मातेच्या साक्षीने वचन देतो 
मी रेणुका देवीच्या साक्षीने शपथ देतो की, आपण पक्ष हित जपू या, देशात व्यक्ती मोठी नसते देश मोठा असतो. आणि येणाऱ्या काळात आपण लोकांना सांगूया दिव्यांगासाठीच्या योजना, एकाधिकार तूर खरेदी योजना, जलयुक्त शिवार योजना हे सगळं आपण केलंय. अटल बिहारी वाजपेयी हे एक वेगळ व्यक्तीमत्व होत असं सांगून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने खालच्या दर्जाचे राजकारण केले आहे. त्यांना जनता माफ करणार नाही. येथे ऊसाचे राजकारण करू पाहत आहेत. 

आम्ही शांत बसतो याचा वेगळा अर्थ देवू नका रेल्वे बोगी प्रकल्पामुळे पन्नास हजार लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. कार्यकर्त्यांनी आप आपले मतभेद बाजुला ठेवून भारतीय जनता पक्षाचं सरकार आणण्यासाठी काम करावे, उद्याच्या उज्वल भविष्यासाठी आणि देश सुरक्षित ठेवण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा भाजपच सरकार आणू या, चार वर्षात एकही बॉम्बस्फोट झाला नाही असं सांगून पुर्ण ताकदीने, एकदिलाने काम करण्याची विनंती यावेळा ना . संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment