रेणापूर / प्रतिनिधी
पक्षापेक्षा व्यक्ती मोठी नसते, असं सांगून भारतीय जनता पक्षाचे काम हे देशहिताचं, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या कल्याणाचे आहे.त्यामुळेच थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात. पिक विमा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव हा मोदी आणि फडणवीस यांच्या काळात दिला जात आहे. घरकूलाची कामे आहेत. रस्त्याची कामे आहेत. मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरू आहेत, आपण आणखीन इकडं लक्ष द्या आमची लढाई फार मोठ्या शक्तीविरोधात आहे. पण कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आम्ही हे सगळं करत आहोत. असे भाजपा लातूर ग्रामीण चे नेते रमेशअप्पा कराड यांनी प्रतिपादन केले
या ठिकाणी महिला बालकल्याण सभापती संगीता घुले यांनी अत्यंत चांगले भाषण केले असे सांगून पंचायत समितीचे सभापती अनिल भिसे , नगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे, नगरसेवक या सर्वांच्या कठोर परिश्रमामुळे विकासाची कामे होत आहेत. ना. संभाजीराव पाटील निलंगेकर व पंकजाताई मुंडे यांचा पुर्ण सहकार्य रेणापूर विधानसभेकडे आहे. गोपीनाथरावजी मुंडे यांच्यासोबत ज्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी काम केले होते त्यांचाही गोपीनाथरावजी मुंडे यांचे तैलचित्र देवून फेटा घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीस स्व.पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. आ. विनायकराव पाटील साहेब मला आश्चर्य वाटलं मी एकटा आहे असं तुम्ही मनलात. तुमच्या बाजुने पालकमंत्री आहेत, मी आहे सर्व भाजप आहे तुम्ही डिस्टरब होऊ नका असेही रमेशअप्पा कराड विनायकराव पाटलांना म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात रमेश कराड म्हणाले की, मी काल निलंग्यात पाहिलं अरविंद भैय्या यांचे काम नियोजन आणि आपण सर्वांनी नागपूर पाठोपाठ लातूर जिल्हा भाजपमय करणाऱ्याचे नियोजन करणाऱ्या अरविंद पाटलांच्या अभिनंदनासाठी सर्वांनी टाळ्या वाजवाव्या असंही रमेश कराड म्हणाले.
आपण गांधी आणि बुद्धांच्या देशातील आहोत. शांतता आणि संयम ही आपली संस्कृती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात काहीही अनुचित घडू नये म्हणून महापुजेला येण्याचे टाळले व घरात विठ्ठल-रूख्मिणीची पुजा केली असं सांगून मला ताकद देणारे कार्यकर्ते व त्यांचे हित महत्वाचं असंही रमेशअप्पा कराड म्हणाले.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment