ओमप्रकाश देवडा पिपल्स बॅंकेस पुरस्कार

Tuesday, September 11, 2018

हिंगोली / प्रतिनिधी
दिल्ली येथे घेण्यात आलेल्या फ्रॉटीस इन कॉपरेटीव्ह बॅंकींग अवॉर्ड सोहळ्यामध्ये सक्षम बॅंका पैकी एनपीए मॅनेजमेंटसाठी बेस्ट एनपीएएम मॅनेजमेंट असलेल्या भारतातील बॅंकांमधून ओमप्रकाश देवडा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंक लि. हिंगोलीची निवड करण्यात आली. बॅंकेला एनपीए मॅनेजमेंट अवॉर्ड 2018 हा पुरस्कार मिळाला आहे.


सदर पुरस्काराचे वितरण भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे माजी डेप्युटी गवर्नर गांधी, माजी मुख्य सरव्यवस्थापक रत्नाकर देवळे, संचालक सतिश मराठे, ठाणे जनता बॅंकेचे सहकारी बॅंकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी उतेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी बॅंकेचे अध्यक्ष सुनिल देवडा, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पतकी यांनी पुरस्कार स्विकारला.

No comments:

Post a Comment