भारतीय महिला क्रिकेट टीम चा श्रीलंका दौरा

Tuesday, September 11, 2018

दुबई : आयसीसी चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या टप्प्यानुसार भारतीय महिला संघ ११ ते १६ सप्टेंबर या काळात श्रीलंकेचा दौरा करणार आहे .  आयसीसी महिला विश्वचषक २०२१ साठी पात्र ठरण्याच्या स्पर्धेत भारतासहित श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि द.आफ्रिका शेवटच्या चार स्थानांवर फेकले गेले आहेत. तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांनी पहिल्या चार स्थानावर झेप घेतली आहे..

२०१७ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या भारतीय संघाच्या खात्यात सहा सामन्यांत चार गुण जमा झाले आहेत. परिणामी भारतीय संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी फेकला गेला आहे. घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाकडून मानहानीकारक पराभवाचा सामना भारताला करावा लागला होता. त्यामुळे २०२१ विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी भारतीय महिलांसाठी श्रीलंकेचा दौरा महत्त्वाचा आहे. पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत श्रीलंकेची गुणांची पाटी कोरी राहिली आहे. तसेच भारताविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत त्यांना ३-० असा पराभव स्वीकारावा लागला होता.

 त्यामुळे भारताविरुद्धच्या गेल्या सामन्यातील पराभवाचे उट्टे काढण्याचा श्रीलंकेचा प्रयत्न असेल. क्षमतेनुसार खेळण्यास प्राधान्य असेल. या मालिकेत सर्वाधिक गुण मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. गुणतालिकेत नक्कीच अव्वल स्थानी झेप घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे भारतीय संघाची कर्णधार मिताली राज म्हणाली.

भारतीय संघ.

मिताली राज (कर्णधार), तान्या भाटिया, एकता बिष्ठ, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वमी, डी.हेमलता, मानसी जोशी, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णूमर्ती, स्मृती मंधाना, शिखा पांडे, पूनम राऊत, जेमिमा रॉड्रिगेज, दीप्ती शर्मा, पूनम यादव..

No comments:

Post a Comment