देवघर राजकारणात सक्रिय

Saturday, September 8, 2018


लातूर :देशाचे माजी गृहमंत्री , माजी राज्यपाल, विविध खात्यांचे मंत्री ,लोकसभेचे आणि विधानसभेचे सभापती, अनेक वर्ष आमदार आणि खासदार म्हणून काम केलेले, काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांच्या विश्वासू गटात समाविष्ट असणारे आणि काँग्रेसचा स्वच्छ चेहरा  म्हणून परिचित असणारे शिवराज पाटील चाकूरकर हे गेल्या काही दिवसात राजकारणापासून अलिप्त असल्याचे जाणवत आहे .परंतू देशातील व राज्यातील एकंदर परिस्थिती आणि आज काँग्रेसची असणारी अवस्था पाहता ते किंवा त्यांच्या घरातील एखादी व्यक्ती राजकारणात सक्रिय असणे काळाची गरज बनली  आहे .त्यामुळे' देवघर 'पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा सुरू असून त्यादृष्टीने हालचाली सुरू असल्याचे जाणवत आहे.

 शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूर पालिके पासून ते लोकसभा आणि राज्यसभा इथपर्यंत काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधीत्व केले. राजकारण करताना त्यांनी आपली प्रतिमा कधीही खराब होऊ दिली नाही. स्वच्छ चेहरा ही त्यांची ओळख  राजकीय क्षेत्रात पन्नास वर्षाहून अधिक काळ काम करूनही कायम आहे. किंबहुना चाकूरकर यांच्यासारख्या चेहऱ्यामुळे  काँग्रेसही टिकून आहे .परंतु मोदी सरकार आल्यापासून आणि राज्यपाल पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर चाकूरकर राजकारण आणि पक्षापासून काहीसे अलिप्त असल्याचे जाणवत आहे . दरम्यानच्या काळात काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट बनली आहे .

या अवस्थेतून काँग्रेसला बाहेर काढण्यासाठी प्रत्येक जागा जिंकणे महत्त्वाचे आहे. त्याच दृष्टिकोनातून लातूर जिल्ह्यातील एका जागेवर चाकूरकर यांच्या घरातील उमेदवार द्यावा असा मतप्रवाह पक्षात आहे .चाकूरकर किंवा त्यांच्या घरातील कोणीही सध्यातरी तिकीट मागितले नाही . परंतु पक्ष पातळीवर तशा  हालचाली सुरू आहेत. काहींच्या मते चाकूरकर यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चनाताई पाटील यांनी लातूर शहरातून विधानसभेची निवडणूक लढवावी तर काहींच्या मते त्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी योग्य आहेत. लातूर शहरात सध्या अमित देशमुख आमदार आहेत परंतु शहरा ऐवजी ग्रामीण मधून लढणे  त्यांच्यासाठी अवघड नाही .त्यामुळे ही जागा अर्चनाताईंना सोडावी असेही सांगितले जाते .खुला  असणाऱ्या उस्मानाबादमधून अर्चनाताई विजयी होऊ शकतात त्यामुळे कुठे का असेना अर्चनाताई उमेदवार असाव्यात अशी मागणी होऊ लागली आहे .

 उदगीर येथे चालविल्या जाणाऱ्या लाईफ केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून अर्चनाताईचे  सामाजिक कार्य सुरू आहे .अद्ययावत रुग्णालयामुळे अर्चनाताईचे  सामाजिक नेतृत्व व संघटन कौशल्य दिसून येत आहे. शिवाय शिवराज पाटील यांचाही त्यांना पाठिंबा असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत अर्चनाताई या काँग्रेसच्या उमेदवार असतील हे निश्‍चित आहे .दिल्लीतील हायकमांड व  प्रदेश काँग्रेसचा आशीर्वाद यामुळे त्यांचा विजयही निश्चित आहे .यामुळेच चाकूरकर पुन्हा एकदा राजकारणात केंद्रस्थानी येणार असल्याचे निश्चित आहे


मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 

Add करा 9333333548 हा आमचा नंबर


No comments:

Post a Comment