लातूर शहरातील पहिला आगमन सोहळा

Saturday, September 8, 2018

लातूर 
प्रतिवर्षाप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सवास सन 2018 रोजी 126 वर्ष पूर्ण होत आहेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लातूरचा श्रीमंत गणपतीचा आगमन सोहळा दिनांक 8 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आला आहे, यंदा मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने मोठ्या जल्लोषात श्री ची भव्य मिरवणूक निघणार आहे

श्री च्या मूर्तीची उंची 23 फूट असुन पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर तर्फे श्रीं चे वस्त्र तसेच श्रीं चे अलंकार व फुलांचा हार दगडूशेठ हलवाई मंदिर तर्फे त्यांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रींना अर्पण करण्यात येणार आहेत  मिरवणुकीत धाड्स ढोल ताशा पथक,लेझीम पथक,ध्वज पथक,तसेच सर्वपक्षीय जिल्हाध्यक्ष, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,पत्रकार,शहरातील विविध मान्यवर व भाविक भक्त सहभागी असणार आहेत श्री ची मिरवणूक गंजगोलाई मुख्य रस्ता ते गांधी चौक ते शिवाजी चौक ते दयानंद गेट ते खाडगाव रोड या मार्गावरून दुपारी 3 वा.निघणार आहे...तरी या सोहळ्याला सर्व लातूर करांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे स्वागत-अध्यक्ष डॉ. शिवाजी काळगे,अध्यक्ष धनंजय वराळे,उपाध्यक्ष धनंजय शेळके सचिव विशाल जाधव आणि मंडळाचे सर्व आयोजकांनी केले आहे..

No comments:

Post a Comment