अलिबाबाचे जॅक मा निवृत्त होणार नाहीत

Monday, September 10, 2018

पेईिचंग : अलिबाबाचे सहसंस्थापक व अध्यक्ष जॅक मा हे सोमवारी सेवानिवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ते केवळ आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची घोषणा करतील. न्यूयॉर्क टाईम्समध्ये जॅक मा निवृत्त होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याचे खंडन अलिबाबा या कंपनीने केले आहे. 

अलिबाबाच्या मालकीच्या असलेल्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रातही त्याबाबत त्यांचे स्पष्टीकरण प्रसिद्ध झाले आहे.चीनचे मोठे अब्जाधीश असणारे उद्योजक जॅक मा सोमवारी आपल्या ५४ व्या वर्षी निवृत्त न होता आपला वारस कोण असेल याविषयी घोषणा करणार आहेत, मात्र नजीकच्या काळात ते कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून राहाणार आहेत.

 जॅक मा निवृत्त होणार असून ते शिक्षणक्षेत्रात सेवा करणार असल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झाले होते.सोमवारी जॅक मा हे आपला वारस कोण हे जाहीर करणार आहेत. युवा अधिकारी असणाऱ्यांची पिढी पुढे राहावी, तिने भविष्यातील मार्गक्रमण करावे, यासाठी त्यांना पुढे आणण्याच्या योजनेमधील हा एक भाग आहे, असे अलिबाबाच्या प्रवक्त्याने सांगितले. .

No comments:

Post a Comment