मुंबई दि हरियाणाची ही लोकप्रीय धमाकेदार डान्स परफॉर्मन्सने लोकांना वेड लावणारी सपना चौधरी लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार आहे . होय, ‘दोस्ती के साईड इफेक्ट्स’ या बॉलिवूडपटात सपना चौधरीची वर्णी लागली आहे.
विक्रांत आनंद सोबत ती या चित्रपटात दिसणार आहे . जोयल डॅनिअलची निर्मिती असलेला हा चित्रपट हादी अली अबरार दिग्दर्शित करणार आहे. ‘कसौटी जिंदगी की’चे जुबैर खान आणि अंजू जाधव यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत . सध्या सपनाचर्चेत आहे ती तिच्या मेकओव्हरमुळे. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर सपनाने जबरदस्त ग्लॅमरस मेकओव्हर केला आहे.
सपना १२ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. घरची परिस्थिती बेताची असल्याने एवढ्या लहान वयात तिला घरची जबाबदारी उचलावी लागली त्यामुळेच ती गायन आणि नृत्याकडे वळली सपनाने वयाच्या नवव्या वर्षांपासून ती डान्स व गाण्यांचे परफॉर्मन्स करतेय. मुळची रोहतक येथे राहणारी सपना यु-ट्यूबवर प्रचंड लोकप्रीय आहे. तिने गायलेले ‘है सॉलिड बॉडी’ हे गाणे तुफान गाजले होते...
आज तर सापांना चौधरींची एक झलक पाहाण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. सपनाच्या कार्यक्रमात ती एकटीच अनेक तास लोकांचे मनोरंजन करते आणि विशेष म्हणजे ती कायम पंजाबी ड्रेसमध्येच परफॉर्म करते.

No comments:
Post a Comment