कोल्हापूर
सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजावर अन्याय करत आहेत त्या मुळे समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सकल मराठा समाजाचा राजकीय पक्ष स्थापन करणार असून ऑक्टोबर मध्ये त्याची घोषणा करणार असल्याची माहिती मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी दिली
सर्वच पक्षात नेतृत्व करणारे मराठा असून देखील मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला नाही. यामुळे ‘मराठा समाजाचा राजकीय पक्ष हा ‘आरक्षण, संरक्षण, शिक्षण, उद्योग, रोजगार आणि शेती’ या सहा सूत्रांवर आधारित काम करणार आहे. या पक्षाच्या माध्यमातून मराठा समाजाची व्होट बँक निर्माण करण्यात येणार आह, असं सुरेश पाटील म्हणाले.

No comments:
Post a Comment